चंद्रपूर, ता. २० : दीनदलितांच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या स्मृतिनिमित्त गांधी मार्गावर डॉ. आंबेडकरांचा पुतळा बांधण्यात आला. तेव्हापासून या चौकाला त्यांच्या नावाची ओळख झाली. आज हा चौक गोरगरिबांचा थांबा म्हणून ओळखू लागला आहे.
२० मे १९६९ रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चंद्रपुरात आल्या होत्या. तेव्हा रिपब्लिकन नेते, राज्यसभेचे माजी सभापती बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुढाकारातून गांधी मार्गावर साकारलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण या दिवशी इंदिराजींच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री वसंतदादा नाईक यांचीही उपस्थिती होती. तेव्हापासून या चौकाला आंबेडकर पुतळा चौक म्हणून ओळखू लागला.
पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट आणि गांधी चौक ते बिनबा गेट मार्गाला जोडणारा हा चौक. गोलबाजाराच्या शेजारी हा चौक असल्याने येथे छोटे व्यावसायिक बसतात. पूर्वी येथे दिवाळीला ङ्कटका विक्री, तर रक्षाबंधनला राख्यांची विक्री व्हायची. गत दोन वर्षांपासून महानगरपालिकेने ही जागा राखीव केली आहे. दरवर्षी १५ आणि १६ ऑक्टोबरला धम्मचक्र अनुवर्तनदिनाची रॅली, १४ एप्रिलला डॉ. आंबेडकर यांची जयंती आणि सहा डिसेंबरला महापरिनिर्वाणाचा कार्यक्रम
येथे होतो. पुतळ्याच्या शेजारी असलेली मोकळी जागा आता सुशोभित करण्यात आली असून, तिथे बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बौद्ध अनुयायांकडून येथे विविध कार्यक्रम घेतले जातात. पुतळ्याच्या शेजारी भरणारा qचधीबाजार प्रसिद्ध आहे. काही महिला शहरात ङ्किरून भांड्यांच्या बदल्यात जुने कपडे खरेदी करून येथे विक्रीला आणतात. कामगारवर्ग, झोपडपट्टीवासी आणि अत्यंत गरिबांसाठी हे कपडे केवळ १० ते २० रुपये किमतीला विकण्यात येते. शहरातील व्यापारपेठ दर रविवारी बंद असते. त्याचा ङ्कायदा छोटे व्यावसायिक घेतात. शटर बंद दुकानांपुढे कपड्यांची दुकाने लागतात. हे कपडेदेखील ५० ते १०० रुपयांपर्यंत उपलब्ध असतात. शिवाय येथे मिळणारे समोसे, भजे, कचोरी केवळ पाच रुपये प्लेटनुसार मिळते. पूर्वी येथे एक धाबा होता. तिथे केवळ १० ते २० रुपयांत भोजन मिळायचे. याशिवाय लहान मुलांची खेळणी, अंतर्वस्त्रे हेदेखील २० ते २५ रुपयांत मिळतात. पुतळ्याच्या मागे पत्रावळी, चुना, प्लॅस्टिक प्लेटांची विक्री होते. बॅण्डपथकाचे कलावंत नोंदणीसाठी येथे दिवसभर बसून असतात. त्यामुळे आंबेडकर पुतळा ते श्री टॉकीज चौक या मार्गावर गोरगरिबांची नेहमीच गर्दी दिसते.