न्या. धर्माधिकारी यांचे गौरवोद्गार
'शांतारामजी' व 'मदनराव' , न्या. धर्माधिकारी |
चंद्रपूर- दोन जीवलग मित्र कसे असावे, त्यांचे ऋणानुबंध किती घट्ट असावे, आपल्या कार्याने इतरांना प्रेरित करणारे, सदैव दुसर्यांचा विचार करणारे, प्रसंगी सवरेतोपरी मदत करणारा सखा जर आपल्याला मिळाला, तर जीवन सार्थकी झाल्यासारखे वाटते. चंद्रपूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व साहित्यिक जगतात ज्यांनी आपला अमूल्य ठसा उमटविला. असे दोन तपस्वी जर कुणी असेल तर ते म्हणजे 'शांताराम पोटदुखे' व 'मदनराव धनकर' होत. म्हणूनच ते खर्या अर्थाने चंद्रपूरकरांचे आधारवड आहेत, असे गौरवोद्गार गांधी विचारांचे पुरस्कर्ते न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी काढले.
हा अभिनव प्रसंग होता प्राचार्य मदन धनकर यांना देण्यात आलेला चंद्रपूरभूषण पुरस्कार व शांतारामजींचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळय़चा. येथील प्रियदर्शिनी सभागृहात रविवार, १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३0 वाजता हा विलोभनीय सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्यांनी मानातल्या भावनांची उकल केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, पालकमंत्री संजय देवतळे, लोकाग्रणी प्रतिष्ठानचे सचिव अँड. चंद्रकांत देशमुख यांची उपस्थिती होती.
न्या. धर्माधिकारी म्हणाले, कोणताही स्नेह सोहळा हा केवळ सोहळा किंवा एखादा कार्यक्रम नसतो. तर आपण आयुष्यभर जी माणसं जोडली, जी नाती जोपासली, जे सहकार्य केले त्याला कुठेतरी उतराई होता यावे, प्रेम व्यक्त करता यावे यासाठी अश्याप्रकारचे एकत्रीकरण करण्यासाठी असतो. आधुनिक जागात आपण याच गोष्टीला मुकलो असून त्याला आपल्या प्रेमाची, विश्वासाची झालरं बनून चिरकाळ टिकवून ठेवण्याचे काम या दोघांनीच केल्याची पावती त्यांनी दिली. महात्मा गांधींनी मांडलेली रामराज्याची संकल्पना आजच्या उथळ व बेशिस्त समाजाला जागृत करण्यासाठी होती. आपल्याला प्रत्येक गोष्टीत हक्क सांगण्याची सवय असते. राजकारण्यांना ती सवय जरा जास्तच असते. जिथे अशाप्रकारचे हक्कदार नसतात ते रामराज्य आणि जिथे ते असतात ते हराम राज्य. जिथे चंद्रपूरकरांचा आधारवड बनून शांतारामजींनी सांस्कृतिक, साहित्यिक व शैक्षणिक चळवळीला आधार दिला; त्याच आधारवडाला मदनरावांनी अतिशय कुशलतेने हाताळले. या दोघांशिवाय कोणतीच चळवळ यशस्वी होऊ शकली नसती, हे तितकेच खरे. निरपेक्ष भावनेतून जोपासलेली मैत्री ही चिरकाळ टिकते, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी चंद्रपूरकरांना सांस्कृतिक विषयाची शितलता इतके वर्ष नि:स्वाथपणे देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या दोघांनी केल्याचे नमूद करून आपल्या भावनांना वाट मोकळी क रून दिली. चंद्रपूरच्या वातावरणातील प्रदूषण कधीही दुर होऊ शकेल, पालकमंत्री त्यासाठी सक्षम आहेतच. पण मनातील प्रदूषण दूर करण्याची आज जास्त गरज आहे. या दोन नरर%ांचा सत्कार करताना संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांची मूर्ती भेट देण्यात आली. या दोन्ही विभूतींचा कार्यकाळात जरी चारशे वर्षांचे अंतर असले तरी महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांना 'ज्ञानबा तुकाराम' या विशेषणानेच ओळखल्या जाते. हाच वारसा मदनराव व शांतारामजींनी आयुष्यभर जोपासला. यापुढेही ही जोडी नवचैतन्य निर्माण करेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते मदनराव धनकर यांना ११ व्या चंद्रपूरभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांची सहचारिणी इंद्रायनी यांचाही सत्कार करण्यात आला. आपल्या वडिलांवर केलेल्या कविताचे वाचन व मदनरावांचे विचार शब्दरूपाने प्रा. डॉ. पद्मरेखा धनकर-वानखेडे यांनी वाचून दाखविले. मदनरावांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले. शांतारामजींच्या सहस्त्रचंददर्शन सोहहय़ाप्रसंगी ८0 दिव्यांची रोशनाई करण्यात आली. अँड. चंद्रकांत देशमुख यांनी प्रास्ताविकेतून लोकाग्रणी बाबासाहेब देशमुख यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन स्नेहांकितचे सचिव राजा बोजावार यांनी केले. या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर, धनकर कुटुंबीय व नागरिकांची उपस्थिती होती.