সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, November 09, 2013

हाथकडीसह पळाला

बल्लारपूर येथे अल्पवयीन मुलीला पळविणारा आरोपी पोलिसाच्या हातावर तुरी हाथकडीसह पळाला

बल्लारपूर : मोटरसायकलवर आरोपीला बसवून नेत असताना पोलिसांना हिसका देऊन आरोपी हातकडीसह पळून गेला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता घडली. विशाल कन्हैय्या कुमरे (२0) रा. लालबोडी गोरक्षण वार्ड, बल्लारपूर असे आरोपीचे नाव आहे.
अल्पवयीन मुलीला पळविल्याच्या आरोपाखाली बल्लारपूर पोलिसांनी विशाल कुमरे याला ६ नोव्हेंबरला अटक केली होती. त्याला बल्लारपूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. कोठडीत ठेवण्यासाठी सुधाकर इटनकर व बंडू मत्ते हे पोलीस मोटरसायकलने त्याला घेऊन चंद्रपूरकडे निघाले होते. वाटेत येथील पेट्रोलपंपवर पेट्रोल भरण्याकरिता मोटरसायकल थांबविली असता संधी साधून आरोपी विशालने पोलिसांना झटका देऊन तेथून पसार झाला. यावेळी त्याच्या हाताला हातकडी लागूनच होती.कालपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

बल्लारपूर येथे ३ लाखांचा जुगार सापडला…. ११ जणांना अटक…। 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.