शेवटच्या घटकांपयर्ंत कल्याणकारी योजना पोहोचवून विकासाबरोबरच या घटकांच्या सामाजिक उत्थानाचा मार्ग प्रशस्त करण्यावर केंद्र व राज्य सरकारचा विशेष भर असल्याने या योजनांची अंमलबजावणी करणार्या अधिकार्यांनी विकासाचा हा प्रवाह अंतिम घटकांपयर्ंत पोहचेल याची खबरदारी घेतांनाच कर्तव्य समजून यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्यूत केंद्राच्या विस्तारीत प्रकल्पाअंतर्गत सामाजिक दायित्व निधीतून प्रस्तावित विकास कामाच्या भूमिपूजनाप्रसंगी मुधोली येथे आयोजित कार्यक्रमास ते संबोधित करीत होते.
या कार्यक्रमास वरोरा विधानसभा क्षेत्राचे आ.र सुरेश धानोरकर, पूर्व पालकमंत्री संजय देवतळे, जि.प. सभापती सौ. अर्चना जीवतोडे, भद्रावती पं.स. सभापती विद्या कांबळे, जि.प. सदस्य मारोती गायकवाड, पं.स. सदस्या कु. नाजुका मंगाम, भद्रावतीचे तहसिलदार शितोळे, चंद्रपूर महाऔष्णिक विद्यूत केंद्राचे चव्हाण, भाजपा तालुका अध्यक्ष तुळशिराम श्रीरामे, तालुका महामंत्री नरेंद्र जीवतोडे, मुधोलीच्या सरपंच सौ. चवरे, कोंडेगांव सरपंच रवि घोडमारे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीमध्ये शेवटच्या व्यक्तींचा विकास दृष्टीक्षेपात ठेवून कल्याणकारी योजनांवर विशेष लक्ष केंद्रीत केले असल्याने चैफेर विकासाला गती लाभली आहे. आज विकासाभिमुख योजनांच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात विकासाला नवी दिशा लाभली आहे. शुध्द पेयजल, सिंचनाच्या सुविधा, रोजगाराच्या संधी, परिसर स्वच्छता, स्वास्थ्य सुविधा व सुदृढ असे जनजीवन आपण बघतो आहोत असेही ते म्हणाले.
यावेळी आ. सुरेश धानोरकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाचा परार्मश घेत या विकासामुळे खेडी विविध क्षेत्रामध्ये स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे सांगत स्थानिक शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक व खासगी यंत्राणांनी सामाजिक दायित्व जोपासून विकासाच्या कार्यात योगदान द्यावे असे सांगितले. योजनांचा लाभ सर्वांपयर्ंत पोहचण्यासाठी निधीची तारतम्यातून विल्हेवाट लावण्यावर अधिकार्यांनी भर द्यावा असेही ते म्हणाले.
यावेळी संजय देवतळे व अन्य मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. चंद्रपूर महाऔष्णिक विद्यूत केंद्राद्वारे सामाजिक दायित्व निधीतून मुधोली येथे स्वास्थ्य केंद्रासाठी रस्ता खडीकरण, घोडपेठ येथील निवासी शाळेकरिता सिमेंट कॉंक्रीट रस्ता, कोंडेगांव येथे सिमेंट नाला बंधारा व खोलीकरण, वायगांव येथे सिमेंट नाला बंधारा व खोलीकरण, मौजा वायगांव रै. येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता, सीतारामपेठ येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता तसेच मुधोली बेघर वस्तीत रस्त्याचे खडीकरण आदी कामे प्रस्तावित करण्यात आले असून या विकास कामांसाठी सीएसआर अंतर्गत ७९ लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुधोली येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या सर्व कामांचे भुमिपुजन केले. यावेळी या गावातील सरपंच तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.