बल्लारपूर: येथील वनविकास महामंडळाच्या डेपोतून चोरी केलेले लाकूड बल्लारपूर पोलिसांनी काल (दि. २५ ) रात्री बसस्थानक परिसरात पकडले. या लाकडाची किंमत ४६ हजार ११२ रुपये असल्याचे सांगण्यात येते.
चोरीच्या आरोपात तिघांना अटक केली असून त्यांची नावे सूरज किशोर आवळे, विजयराज कांबळे (दोघेही रा.मौलाना आजाद वार्ड, बल्लारपूर) आणि संजय गुड्ड शिवपाल सिंह गौर (रा. लालपेठ कालरी चंद्रपूर) अशी आहेत. या तिघांनी मिळून येथील वनविकास महामंडळाच्या डेपोत असलेले लाकूड दोन दिवसांपूर्वी चोरले आणि ते चंद्रपूरला नेऊन त्याची कटाई केली. कटाई केलेले लाकूड टेम्पोने बल्लारपूरला आणत असताना नाकाबंदीवर असलेले वाहतूक निरीक्षक नामदेव काळे व त्यांचे सहकारी आर.आर. ठाकूर, जनार्दन ठाकूर यांनी टेम्पोला (एम.एच.३४ एबी ५७५५) पकडले. टेम्पो आणि लाकूड असा दोन लाख किंमतीचा माल जप्त केला आहे. वनविकास महामंडळाच्या अधिकार्यांना डेपोतून लाकूड चोरी गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात आज तक्रार केली. यावरुन या तिघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंजाबराव मडावी करीत आहेत. |
Tuesday, August 27, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য