चंद्रपूर - जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून हिवताप निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येत असला, तरी अवघ्या पाच महिन्यांत हिवतापाचे चार, तर डेंग्यूचा आठ ठिकाणी उद्रेक झाला आहे. यात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. तर, आतापर्यंत ग्रामीण भागातील एकूण 36 लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे.
एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कार्यकाळात एकूण 12 ठिकाणी या आजाराचा उद्रेक झाला. हिवतापाचा चिमूर तालुक्यातील बोथली, गोंडपिंपरीतील गणेशपिंपरी, ब्रह्मपुरीतील हळदा, कोरपनातील निजामगोंदी येथे उद्रेक झाला. यादरम्यान राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत सुमारे 800 लोकांचे रक्तनमुने घेऊन उपचार करण्यात आले. यापैकी 11 लोकांत हिवतापाची लागण झाल्याचे दिसून आले. दुर्दैवाने पाच जणांचा मृत्यू झाला. बोथली येथील सोनाबाई सोनुने, गणेशपिंपरी येथील मोरेश्वर चंदगिरवार, हळदा येथील मोरेश्वर मुलकर, मुकरू खेवले आणि सुधाकर गेडाम यांचा मृतांत समावेश आहे. ब्रह्मपुरीतील हळदा येथील नागरिक कामानिमित्त परप्रांतात गेले होते. ही मंडळी परत आली, तेव्हा त्यांना हिवतापाची लागण झाली होती. या गावात अवघ्या चार दिवसांत तिघांचा मृत्यू झाला.
ऑगस्ट महिन्यात आठ ठिकाणी डेंग्यू तापाचा उद्रेक झाला. चिचपल्लीनजीक असलेल्या गोंडसावरी, सावलीतील पेटगाव, गोंडपिंपरीतील धामणगाव आणि ब्रह्मपुरीतील चिचखेडा, कुडेसावली आणि चौगान येथे हा उद्रेक झाला. तपासणीदरम्यान एकूण 108 लोकांची रक्तजल तपासणी करण्यात आली. यापैकी 36 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले. सुदैवाने उपचार झाल्याने बहुतेक रुग्ण बरे झाले आहेत. डेंग्यूने विहीरगाव येथील 11 वर्षांची ज्ञानेश्वरी शेरकी हिचा मृत्यू झाला आहे. मागील पाच महिन्यांत आरोग्ययंत्रणेने एक हजार हा रक्तनमुने, तर 108 रक्तजल नमुने घेतले. यात 12 लोकांना हिवतापाची, तर 36 लोकांना डेंग्यूची लागण झाल्याचे दिसून आले. शहरी भागातील डेंग्यूची लागण झाल्याचे दिसून येत आहे.

http://chandrapurnews.blogspot.in/