प्रस्तावित
कृषी विद्यापीठ
मागणी
मूलची, जागा qसदेवाहीत!
देवनाथ
गंडाटे : सकाळ
वृत्तसेवा
चंद्रपूर,
ता. ६ :
अकोला येथील डॉ.
पंजाबराव कृषी
विद्यापीठाचे विभाजन करून
पूर्व विदर्भात नवीन कृषी
विद्यापीठ स्थापन करण्याकरिता
अभ्यास समितीची स्थापना
करण्याची घोषणा राज्याचे
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनी केली. त्यानुसार
नियुक्त केलेली अभ्यास समिती
जिल्ह्यातील मूल येथे पाहणी
करणार आहे. मात्र,
भौतिक सुविधा आणि
मनुष्यबळाचा विचार करता
मूलऐवजी qसदेवाही
येथील विभागीय कृषी संशोधन
केंद्र विद्यापीठासाठी
सयुक्तिक ठरेल, अशी
मागणी आता पुढे येत आहे.
इंग्रज
राजवटीत १९११ मध्ये qसदेवाही
येथे कृषी संशोधन केंद्राची
स्थापना करण्यात आली.
सुरुवातीला ऊस लागवड
व संशोधन हा केंद्राच्या
स्थापनेमागील उद्देश होता.
मात्र, त्यानंतर
कृषी हवामान, पर्जन्यमान
यांचा विचार करून विभागाच्या
निकडीप्रमाणे भात बीजोत्पादन
व संशोधनाचे कार्य १९२२ पासून
सुरू करण्यात आले. १९७०
पासून हे केंद्र डॉ. पंजाबराव
देशमुख कृषी विद्यापीठाच्या
कार्यक्षेत्रात आले.
विदर्भातील भात
संशोधनाचे हे मुख्य केंद्र
आहे. पूर्व विदर्भ
विभागाकरिता १९८४ पासून
राष्ट्रीय कृषी संशोधन
प्रकल्पांतर्गत विभागीय कृषी
संशोधन केंद्र qसदेवाही
येथे स्थापन करण्यात आले आहे.
या केंद्रांतर्गत
कृषी संशोधन केंद्र, qसदेवाही,
साकोली (जि.
भंडारा), नवेगावबांध
(जि. गोंदिया),
आमगाव (जि.
गोंदिया) व
सोनापूर (जि.
गडचिरोली) या
केंद्रांचा समावेश आहे.
विभागीय कृषी संशोधन
केंद्रात पूर्व विदर्भ विभागास
उपयुक्त भात (धान)
जातींची निर्मिती
करणे, धान व धानावर
आधारित पीक पद्धतीचे संशोधन
करणे व मशागत तंत्रज्ञान
विकसित करणे, धानाच्या
निरनिराळ्या जातींची रोग व
किडीबाबत प्रतिकारकता पडताळून
पाहणे, धानावरील
रोग व किडीसाठी नियंत्रणाचे
उपाय शोधून काढणे, मूलभूत,
पायाभूत व सत्यप्रत
धान बीजोत्पादन करणे, विकसित
कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार
करणे आदी उपक्रम घेतले जातात.
विद्यापीठ
कशासाठी?
भारताचे
माजी कृषिमंत्री पंजाबराव
देशमुख यांच्या मार्गदर्शनात
राष्ट्रीय कृषी आयोगाने
भौगोलिक स्थिती, जमीन,
हवामान, पर्जन्यमान,
पीकपद्धती, या
घटकांचा विचार करून देशात
शेती विकासासाठी शिक्षण व
संशोधन व विस्तारासाठी कृषी
विद्यापीठाची स्थापना केली.
पूर्व विदर्भात
राज्यातील सर्वाधिक क्षेत्र
धानपीक लागवडीखाली आहे.
या क्षेत्रातील सर्वाधिक
जनता भातपीक शेतावर निर्भर
आहे. त्यामुळे
भविष्यात कृषी संशोधन व
आधुनिकीकरणासाठी कृषी
विद्यापीठाची गरज आहे. कृषी
विद्यापीठातून शेतकèयांना
मार्गदर्शन करणे सोईस्कर
होईल. त्यासाठी
राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण
विखे पाटील यांनी अकोला आणि
राहुरी कृषी विद्यापीठाच्या
विस्तारासाठी विभाजनाचा
प्रस्ताव ठेवला आहे. अकोला
येथील विद्यापीठाचा विस्तार
११ जिल्ह्यात आहे. त्यामुळे
त्याचे विभाजन करून भात
क्षेत्रातील चार जिल्ह्यांसाठी
विद्यापीठाची गरज आहे.
qसदेवाहीत
उपलब्ध सुविधा
१७५
हेक्टर शेतजमीन
५०
हेक्टर जागेवर भात संशोधन
केंद्राचे कार्यालय, कृषी
तज्ज्ञांचे निवासस्थान,
गोदाम, वसतिगृह
व सभागृह आहे. कार्यालयाची
नवीन इमारत, कृषी
तज्ज्ञांचे निवासस्थान,
प्राध्यापक व कर्मचाèयांचे
निवासस्थान आहे.
कोणत्या
सुविधा हव्यात
संशोधन
कार्यालयाची अत्याधुनिक
इमारत, शेती संशोधन
आधारित शेतकरी साहित्य,
वस्तू, यंत्र-तंत्रज्ञान
संग्रहालय, वाचनालय,
माहिती केंद्र,
शेतकèयांना
ङ्किरते मार्गदर्शन पथक,
प्रयोगशाळा,
जैवविविधतेवर आधारित
कृषी वनशेती, शास्त्र
संशोधन केंद्र, कृषी
विद्यावन शास्त्र महाविद्यालय,
शेतकèयांना
प्रशिक्षणासाठी सभागृह,
क्षेत्रीय शेतीपूरक
व्यवसायासाठी ङ्कळबाग व
ङ्कळप्रक्रिया, मशरूम,
मत्स्य, रेशीम,
लाख, पशुसंवर्धन,
वन उत्पादने, शेतीपूरक
विकास केंद्र, महिला
शेतकèयांना पूरक
व्यवसाय प्रशिक्षण केंद्र,
जिल्हापातळीवर कृषी
विद्याविस्तार यंत्रणा,
अद्ययावत कृषी माहिती
व विक्री केंद्र.
कृषीवर
आधारित असलेल्या ग्रामीण
जीवन संस्कृतीमध्ये माध्यमिक
शिक्षण अभ्यासक्रमात इयत्ता
आठवी ते दहावीपर्यंत कृषी
विषय लागू करणे, कृषी
विद्यापीठातील पदव्युत्तर
उमेदवारांना परवाना शिक्षक
म्हणून नियुक्ती व अनुदानेत्तर
लाभ हवा.
विद्यापीठाचे
उपक्रम.....पश्चिम
विदर्भ....पूर्व
विदर्भ
संशोधन
केंद्रे १४.........७
कृषी
महाविद्यालये- २७.......४
कृषी
शेतकी विद्यालये..४४......१६
कृषी
विज्ञान केंद्र......८.........४
कृषी
विस्तार केंद्र...४......१
कर्मचारी
संख्या- ९००.......५०
---------
विद्यापीठाच्या
कार्यावर देखरेख आणि मार्गदर्शन
समितीत पूर्व विदर्भातील
कार्यकारी सदस्यसंख्या कमी
आहे. विद्यापीठात
अनेक पदे रिक्त असून, कृषी
शिक्षण व संशोधन विस्तारात
उणिवा आहेत. विद्यापीठातील
पदभरती, कर्मचारी
qबदूनामावली,
पदोन्नतीत गोंधळ आहे.
-------------------------------
उपलब्ध
सुविधा आणि जागेचा विचार करता
विद्यापीठासाठी qसदेवाही
हेच ठिकाणी योग्य आहे.
- प्रा.
अतुल देशकर, आमदार,
ब्रह्मपुरी
माजी
मुख्यमंत्री मा. सा.
कन्नमवार यांची कर्मभूमी
असलेल्या मूल येथे विद्यापीठ
झाल्यास त्यांना आदरांजली
ठरेल.
- सुधीर
मुनगंटीवार, आमदार,
बल्लारपूर-मूल
चार
जिल्ह्यांसाठी विद्यापीठ
होत असल्याने ते मध्यवर्ती
ठिकाणी असावे. सुविधा
लक्षात घेता qसदेवाहीच
सयुक्तिक आहे.
- मधुकर
भलमे, प्रगतशील
शेतकरी, चारगाव
कृषी
विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात
आपले मत अभ्यास समितीपर्यंत
पोहोचविण्यासाठी शेतकèयांनी
लिहावे.
पत्ता
: सकाळ विभागीय
कार्यालय, तिरुपती
अपार्टमेंट, छोटा
बाजार, चंद्रपूर
ई-मेल-sakalchandrapur@rediffmail.com