সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, August 04, 2013

पालकमंत्री संजय देवतळे यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहाणी

मूलभूत सुविधा तात्काळ पुरविण्याचे प्रशासनाला आदेश
चंद्रपूर दि.04- अतिवृष्टीमुळे चंद्रपूर शहरात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहाणी आज पालकमंत्री संजय देवतळे यांनी केली.  शुध्द पाणी, वीज, आरोग्याच्या सुविधा तसेच अन्नधान्य आदी सुविधा तात्काळ पुरविण्याचे आदेश जिल्हा प्रशासन व महानगर पालिका प्रशासनाला दिले.  जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, नगर सेवक नंदू नागरकर, सुनिता लोढीया व अधिकारी यावेळी सोबत होते.
    पठाणपूरा गेट, विठ्ठल मंदिर वार्ड, मिलींद नगर, हनुमान खिडकी, हवेली गार्डन, सिस्टर कॉलनी, गोपाल पुरी, बालाजी वार्ड व ठक्कर कॉलनी इत्यादी ठिकाणी आज पालकमंत्री यांनी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष  पाहाणी केली.  प्रशासनाकडून पूरग्रस्त नागरिकांना पुरविण्यात येणा-या सोई सुविधांचा आढावाही या दौ-यात त्यांनी घेतला.  येथील नागरिकांशी पालकमंत्री संजय देवतळे यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
    वीज, पाणी व सफाई याबाबत नागरिकांनी आपले म्हणने पालकमंत्री यांना सांगितले.  स्वक्षता व साफसफाई महानगर पालिकेने तातडीने करावी तसेच नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दयाव्यात अशा सूचना मनपा आयुक्तांना पालकमंत्र्यांनी दिल्या.  ब-याच भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे घरगुती सामान व दैनंदिन गरजेच्या वस्तु भिजल्या आहेत.  अशा नागरिकांना तातडीनी मदत पुरविण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले. 
    शहरातील ज्या भागात पुराचे पाणी शिरले अशा ठिकाणी आजाराची साथ पसरु नये म्हणून आरोग्य विभागाने योग्य त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात.  पडझड झालेल्या घरांचा सर्व्हे तातडीने करुन नुकसान ग्रस्तांना शासकीय मदत ताबडतोब दयावी असेही पालकमंत्री यांनी या पाहाणी दौ-यात प्रशासनाला सांगितले. ज्या भागात अदयाप वीज पुरवठा बंद आहे तो तातडीने सुरु करावा व बंद नळ योजनाही सुरु कराव्यात व टँकरने सुध्दा पाणी पुरवठा करावा असे निर्देश देवतळे यांनी विद्युत विभाग व मनपाला दिले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.