সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, August 31, 2013

टसर कोसा रेशीम व्यवसायाला शासन प्रोत्साहन देणा

चंद्रपूर दि.30- चंद्रपूर जिल्हयात पारंपारिकरित्या करण्यात येणा-या टसर कोसा रेशीम व्यवसायाला शासन प्रोत्साहन देणार असल्याचे वस्त्रोद्योग व पणन विभागाचे सहसचिव सुधीर कुरसंगे यांनी सांगितले. सावली तालुक्यातील पाथरी येथील टसर रेशीम धागानिर्मिती व्यवसायाला नुकतीच भेट दिली त्यावेळी बोलत होते. सहसंचालक ढवळे व रेशीम विकास अधिकारी श्रीधर झाडे हे यावेळी उपस्थित होते.

या विभागाच्या लाभार्थ्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी सुधीर कुरसंगे, सह सचिव (वस्त्रोद्योग) मंत्रालय मुंबई यांनी पाथरी येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांचे सोबत ढवळे सहाय्यक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय अमरावती हेही उपस्थित होते. सह सचिवांनी पाथरी येथील ग्रेणेज विभाग, धागा निर्मिती तसेच वनक्षेत्रामधील ऐन व अर्जून वृक्षाची पाहणी केली. यासोबत येथील लाभार्थी यांचेसोबत चर्चा केली व शासनस्तरावर या व्यवसायाचे विकासासाठी कसोसिने प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन दिले. पाथरी येथील केन्द्रातील कामाकाजाबाबत, रेशीम कोषाचे दर, वनविभागामध्ये येणा-या समस्या इत्यादी बाबत श्रीधर झाडे, रेशीम विकास अधिकारी यांनी सबंधितांना विस्तृत माहिती दिली. सह सचिवांनी येथील सर्व कर्मचा-यांची आढावा सभा घेऊन या व्यवसायाचे विकासासाठी सर्वांनी जाणिवपुर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

चंद्रपूर जिल्हयात टसर कोसा उत्पादन पारंपारिकरित्या ब-याच वर्षापासून घेण्यात येत आहे. टसर कोसा उत्पादन प्रामुख्याने वनामध्ये आढळणारे ऐन व अर्जुन वृक्षाचे पाने खाऊन रेशीम अळया कोष तयार करतात. हे रेशीम कोष वनामध्ये उत्पादित होत असल्याने या रेशमाला वन्य रेशीम असे संबोधले जाते. जिल्हयामध्ये ब्रम्हपूरी, चिमूर, सावली या तालुक्यात मोठया प्रमाणावर ऐन व अर्जुन वृक्ष वन क्षेत्रामध्ये आहेत. याचप्रमाणे रेशीम विभागाने वन विभागाच्या 500 हेक्टर क्षेत्रावर सात गांवामध्ये ऐन व अर्जुन वृक्षाची सलग लागवड केलेली आहे.

या भागात 500 ते 600 ढिवर समाजातील कुटुंब हा व्यवसाय करतात व ब-याच कुटुंबाचे उपजिविकेचे टसर कोसा उत्पादन हे प्रमुख साधन आहे. टसर कोसा उद्योगाचे विकासासाठी शासनाने नव्यानेच रेशीम विकास अधिकारी हे पद निर्माण केले असून जिल्हा रेशीम कार्यालय, पाथरी ता.सावली येथे सुरु केले आहे. या कार्यालयाचे पाथरी येथे टसर कोष बिज उत्पादन केंन्द्र, कोषापासून धागा निर्मितीचे केन्द्र याठिकाणी सुरु आहे व येथे 25 ते 30 महिलांना व पुरुषांना यापासून रोजगार मिळालेला आहे. याशिवाय बिजकोष निर्मितीसाठी पाथरी, सोनापूर, चिचबोडी, चिखली ता.सावली आवळगांव, मेंडकी ता.ब्रम्हपूरी व मोटेगांव ता.चिमूर इत्यादी ठिकाणी 500 हेक्टर वनक्षेत्रामध्ये ऐन व अर्जून वृक्ष लागवड घेण्यात आलेले असून या ठिकाणी बिजकोष उत्पादनाचा कार्यक्रम राबविल्या जाते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.