সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, August 16, 2013

पूरग्रस्तांना मदत करण्यास शासन कटिबध्द - पालकमंत्री

चंद्रपूर- जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून पूरग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समांरभात ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे, खासदार हंसराज अहिर, आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

भाषणाच्या सुरवातीला उत्तराखंड येथील घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना आणि बचाव व राहत कार्य करतांना शहिद झालेल्या सैनिकांना त्यांनी श्रध्दाजंली अर्पण केली. जिल्हयात अतिवृष्टीमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियाप्रती संजय देवतळे यांनी सांत्वना व्यक्त केली.

पूरपरिस्थितीमुळे शेतक-यांच्या 1 लाख 98 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तर 15 हजार 512 घरांचे अंशत: किंवा पूर्णत: नुकसान झाले आहे. या सर्वांच्या पाठीशी शासन उभे असून नुकसानग्रस्तांना शासनातर्फे मदत वाटप सुरु आहे. अतिवृष्टीमुळे 25 नागरिकांचा मृत्यू झाला असून मृतकांच्या नातेवाईकांना 37 लाख 50 हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री निधीतून 1 लाखाची अतिरीक्त मदत घोषित करण्यात आली असून मृतांपैकी 18 व्यक्तिंच्या वारसांना 18 लाखाचे वाटप करण्यात आले तर उर्वरित वाटप निधी प्राप्त होताच करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्हयात चिमूर, मूल व गोंडपिपरी हे तीन नवीन महसूल उपविभागीय कार्यालय 15 ऑगष्टपासून म्हणजे आजपासून कार्यान्वित होत आहेत. यापूर्वी ब्रम्हपूरी, चंद्रपूर, वरोरा व राजूरा हे उपविभागीय कार्यालय होते. नवीन तीन कार्यालय झाल्यामुळे कामकाजात सुसुत्रता येवून नागरिकांना अधिक चांगल्या सोईसुविधा पुरविण्यात मोलाची मदत होणार असल्याचे देवतळे म्हणाले.

सन 2013-14 साठी सर्वसाधारण योजना 136 कोटी, आदिवासी उपयोजना 126 कोटी 11 लाख 84 हजार व अनुसूचित जाती उपयोजना 49 कोटी 98 लाख असा एकूण 312 कोटी 9 लाख 84 हजार रुपये नियतव्यय मंजूर असून या निधीमधून जिल्हयाच्या विकासाच्या विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.



चंद्रपूर जिल्हयाच्या प्रदूषण समस्या दुर करण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शास्त्रीय दृष्टया कृती आराखडा शासन तयार करणार आहे. तो राज्यातील सर्व जिल्हयांना मार्गदर्शक ठरेल असा बनविला जाणार आहे. पालकमंत्री संजय देतवळे यांनी विविध विभागानी जिल्हयात केलेल्या विकास कामांचा आढावा यावेळी भाषणातून घेतला. यावेळी विविध पुरस्काराचे वितरण पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन यांचा विशेष पदक देवून पालकमंत्री संजय देवतळे यांनी सत्कार केला. या कार्यक्रमास स्वातंत्र सैनिक, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.