चंद्रपूर - सततच्या पावसानंतर विदर्भात साथीच्या आजारांनीडोके वर काढले आहे . चंद्रपूर जिल्ह्यात मेडिकलकॉलेजच्या वि द्यार्थिनीचा नागपुरात गुरुवारी डेंग्यूनेमृत्यू झाला . सदर वि द्यार्थिनीला बुधवारीचंद्रपूरातून नागपुरात हलविण्यात आले होते . मागीलपाच महिन्यात जिल्ह्यातील डेंग्यूने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीनवर पोहचली आहे . दरम्यान , जिल्ह्यात डेंग्यूचे १२५ रुग्ण आढळले आहेत .
चंद्रपुरातील वि द्यार्थिनीचा नागपुरात डेंग्यूने मृत्यू
चंद्रपूर : वैष्णवी प्रभावत ( २१ ) ही नागपूर मेडिकलकॉलेजची एमबीबीएसची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. ती आजारी असल्याने चंद्रपुरात घरी परतली होती . चंद्रपुरातील श्वेता हॉस्पिटल येथे तिलासोमवारी भरती करण्यात आले होते . रक्त तपासणीत डेंग्यूचे विषाणू आढळले होते . अचानकतब्येत बिघडल्याने तिला नागपुरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले . पण उपचारादरम्यानतिचा मृत्यू झाला .
चंद्रपूर जिल्ह्यात ७ एप्रिल २०१२ ला राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथे डेंग्यूचा पहिला बळी गेलाहोता . ज्ञानेश्वर शेरकी ( ११ ) असे त्याचे नाव होते . सावली तालुक्यातील उसरपार चक येथीलकैकाडू साखरे ( ६० ) यांचा मंगळवारी गडचिरोलीत मृत्यू झाला होता . कैकाडू हे मुलीकडेगडचिरोलीला गेले होते .
चंद्रपूर जिल्ह्यात डेंग्यूचे सुमारे १२५ रुग् ण आढळले आहेत . चंद्रपूर जिल्ह्यात पूरजन्यस्थितीनिर्माण झाल्यानंतर त्यातून सावरत नाही तोच विषाणूजन्य तापासह डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावरआढळले आहेत . डेंग्यूची संख्या १२५ च्या घरात असून त्यात गोंडपिंपरी तालुक्यातील धामणगावयेथे ७४ , ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचखेडा येथे ३१ तर धानोलीपोहा येथील ६ रुग् णांचा समावेशआहे . यातील सर्वांचे नमुने तपासले असून ते पॉझिटिव्ह असल्याची माहिती सूत्रांनी दिली .जिल्ह्यातील ४२७ गावे डासांच्या उत्पत्तीसाठी संवेदनशील असून तेथे स्वच्छता व जनजागृती केलीजात आहे . दरम्यान , डेंग्यूसंदर्भातील रक्त तपासणीसाठी कीट आली असून आता चंद्रपुरातच हीतपासणी केली जाणार आहे .
चंद्रपुरातील एका खासगी रुग् णालयात सुलभा खुरगे या डेंग्यूच्या रुग् णाला २० ऑगस्टला भरतीकरण्यात आले . गुरुवारी तब्येत सुधारल्यानंतर डिस्चार्ज दिल्याची माहिती रुग् णालयाचे डॉ .शंकरराव अंदनकर यांनी दिली .

जिल्ह्यात डेंग्यूचे रुग् ण आढळले असून विषाणूजन्य रुग्णांची संख् या मोठी आहे .
यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहे .
- डॉ . ए . ए . आठल्ये , जिल्हा आरोग्य अधिकारी