चंद्रपूर : ऑर्बिट सायन्स अॅकडमी ऑफ एज्युकेशनच्या वतीने मे महिन्यात घेण्यात आलेल्या आठवी ते दहावीच्या विद्याथ्र्यांसाठीच्या विज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा १८ आगस्त रोजी सुजल डीएड कालेज रामाला तलाव रोड येथे होत आहे
कार्यक्रमाचे उदघाटन निवासी उपजिल्हाधिकारी बडकेलवार यांच्या हस्ते होत असून, अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष कुक्कु सहानी राहतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑर्बिट सायन्स अॅकडमी ऑफ एज्युकेशनचे व्यवस्थापकीय संचालक पुरषोत्तम चौधरी, बहुजन लल्कारचे संपादक डी के आरीकर, चंद्रपूर टाईम्स चे संपादक राजेश सोलापण, नगरसेवक धनंजय हूड, समाजसुधारकचे प्रमुख नितीन पोहाणे, संपादक शंकरभाऊ झाडे, प्रा. अविनाश काळे, स्वप्नील दोन्तुलवार यांची उपस्थिती राहील.
चंद्रपूर तालुका सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने संचालित येथील आर्बिट सायन्स अकॅडमी ऑफ एज्युकेशनच्या वतीने १९ मे रोजी स्थानिक मातोश्री विद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात आठवी, नववी आणि दहावीच्या सुमारे २५० विद्याथ्र्यांना सहभाग घेतला होता. विद्याथ्र्यांना भावी शैक्षणिक जीवनात स्पर्धा परीक्षा, प्रवेश पूर्व परीक्षांचा सराव होण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. या स्पर्धेचा निकाल नुकताच संस्थेने जाहीर केला आहे. यात वर्ग आठवीतून प्रथम यश अविनाश बांगडे, द्वितीय ओशीन यशवंत पाचभाई, तृतीय शिवानी राजीव धकाते, वर्ग नववीतून प्रथम रुपमदिलीप वासेकर, द्वितीय गायत्री राजीव विठोलकर, तृतीय गौरव लभाने, वर्ग दहावीतून प्रथम नितीन रघुनाथ पेंदाम, द्वितीय स्नेहा पांडुरंग बोढाणे, तृतीय सोमेश विनोदराव आदेवार यांचा समावेश आहे. प्रथम क्रमांकांच्या यशस्वी विद्याथ्र्यांस दोन हजार ५१ रुपये, द्वितीय एक हजार ५१ आणि तृतिय क्रमांकाच्या विद्याथ्र्यांस ५५१ रुपये बक्षिसासह सन्मानचिन्ह देण्यात येईल. सहभागी विद्याथ्र्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे..