बल्लारपूर - मूळच्या महाराष्ट्रात असणा-ऱ्या परंतु बारावीचे शिक्षण इतर राज्यांतून पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसमोर वैद्यकीय प्रवेशाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. या विद्यार्थ्यांना स्थानिक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 85 कोट्यातून लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने या मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या शैक्षणिक सत्रात वैद्यकीय प्रवेशासाठी सामायिक पूर्व परीक्षा (नीट) घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने "नीट'चा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले आहे. तथापि, प्रकिया पूर्ण झाल्याने यावर्षी याच परीक्षेच्या आधारे वैद्यकीय प्रवेश दिला जाणार आहे. "नीट'च्या निकषानुसार ज्या राज्यात महाविद्यालय असेल, त्या राज्यातील विद्यार्थ्यांना 85 टक्के स्थान देण्यात येणार आहे. इतर राज्यातील प्रवेशपात्र 15 टक्के विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. मात्र, स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून सध्या गोंधळ उडाला आहे. बारावीचा अभ्यासक्रम बाहेर राज्यातून पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना इतर राज्यातील विद्यार्थी समजण्यात येईल आणि केवळ 15 टक्के कोट्याचा लाभ देण्यात येईल, अशी भूमिका परिषदेने घेतली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. विदर्भातील अनेक मुले अकरावी किंवा बारावीसाठी आंध्र प्रदेशात जातात. पूर्व परीक्षेची तयारी आणि राहण्याची सोय असल्याने अनेकजण हा पर्याय निवडतात. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. काहींच्या मते ज्या राज्यातून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ते राज्य त्या विद्यार्थ्यांचे रहिवासी राज्य आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. वैद्यकीय परिषदेच्या मते "नीट'साठी ज्या राज्यातील परीक्षा मंडळातून परीक्षा उत्तीर्ण दिली. ते राज्य प्रवेशासाठी मूळ राज्य म्हणून गृहीत धरण्यात येत आहे.