সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, April 01, 2018

महाबली पंचमूखी हनुमानजीच्या नावाने गुंजली चिमुरनगरी

चिमुर तालुका प्रतिनिधी:
        संकटमोचक रुद्रावतार महाबली जयंती निमीत्य चैत्र पोर्णीमाला पंचमूखी हनुमानजीची भव्य मिरवणुक चिमूर शहरातुन काढन्यात आली. यावेळी महाबली हनुमान पंचमुखीच्या नावाने चिमुर नगरी गुंजली.
         शहरातील अनेक हनुमान मंदीरात सकाळ पासुनच चैत्र पोर्णिमाला भावीक भक्तानी पुजा अर्चना केली. इंदीरा नगर येथील जय बजरंग देवस्थानक कमेटी, महाबली हनुमान मंडळ वडाळा (पैकु),मानीक नगर हनुमान मंडळ, पंचायत समीती जवळील हनुमान देवस्थान कमेटी, हजारे मोहल्ला बजरंग कमेटी, आदी मंदीरात भक्तीभावाने भावीकांनी महाबली हनुमानजीच्या मुर्तीला माथा टेकला व हनुमान चालीसाचे पाठ करन्यात आले.
          पंचमुखी हनुमान कमेटीचे विनोद शर्मा यांच्यावतीने चिमुर शहरात भगव्या झेडया व पताका लावुन चिमुर भगवामय करन्यात आला. चैत्र पोर्णीमाच्या सायंकाळी आखाडा,. हनुमानजीची प्रतीकृती, विवीध झाकीसह धुमाल पार्टीच्या तालावर महाबली पंचमुखी हनुमानजी मिरवणुक पंचायत समितीच्या जागृत हनुमान मंदीरातुन बालाजी मंदीर, नेहरू चौक, बसस्थानक परिसर , मासळ रोड, चावडी मोहल्ला, मार्केटलाईन , शिवाजी चौक, गोडं मोहल्ला मार्ग भव्य मिरवणुक काढन्यात आली. यावेळी अनेक हनुमान भक्त धमाल पार्टीच्या तालावर थिरकले या रॅलीत हजारो भावीकांची उपस्थीती होती.नंतर मिरवणुकीची नेहरू विद्यालय जवळ सांगता करन्यात आली.
           महाबली हनुमान जयंतीनिमीत्य शिव साम्राज्य प्रतीष्ठानतर्फे नेहरू चौक येथे सरबतचे वितरन व चिमूर एसटी आगार कर्मचारी युनियन व्दारे महाप्रसादाचे वितरण करन्यात आले. शहरातील विविध प्रभागातील हनुमान मंदीरात हनुमान भक्तासाठी जेवणाची व्यवस्था करन्यात आली होती.
हनुमान जयंती यशस्वी करण्यासाठी विनोद शर्मा ,राकेश  नदुरकर, प्रवीण कावरे,श्रीनिवास निवटे प्रकाश असावा सुधाकर पचारे, प्रफुल कावरे, बंटी वनकर,  विशाल शिवरकर, अभिलाष खारकर सोहेल चन्ने, उमेश सोनवणे ,संदीप घोडमारे,निलेश गिरी, अजय माहुरकर राजू गजभे,छगन दिघोरे,  अफसर शेख  आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.