चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुरात काँग्रेसतर्फे सुरु असलेल्या उपोषण आंदोलन दरम्यान स्टेजवर कार्यकर्त्यांची संख्या जास्त झाल्याने अचानक पने स्टेज कोसळला.यात कोणालाही दुखापत झाली नसून काही वेळातच स्टेजला पुनर्स्थितीत आनण्यात आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्याकडून
प्राप्त झालेल्या सूचनेनुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने
विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात सामाजिक समता
बंधुत्व आणि शांतता यासाठी एक दिवसाचे उपोषण जटपुरा गेट येथे गांधी पुतळ्या जवळ सुरु आहे.
हे आंदोलन सुरु असतांना स्टेजवर अनेक पदाधिकारी बसले होते,तीतक्यातच स्टेजचा काही भाग कोसळल्याने सर्वत्र एकाच खळबळ उडाली.
हे आंदोलन सुरु असतांना स्टेजवर अनेक पदाधिकारी बसले होते,तीतक्यातच स्टेजचा काही भाग कोसळल्याने सर्वत्र एकाच खळबळ उडाली.
या प्रकारामुळे सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ निर्माण झाला. मात्र आयोजकांनी शांततेचे आवाहन केल्याने सभा सुरळीत सुरु झाली.आंदोलना दरम्यान कॉंग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी स्टेजवर जाऊन बसल्याने या बांधलेल्या स्टेजच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन झाले व स्टेज कोसळल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
यावेळी काँग्रेसचे आजी-माजी खासदार आमदार प्रदेश पदाधिकारी ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद सदस्य महिला काँग्रेस युवक काँग्रेस सेवा दल व काँग्रेसचे सर्व सेलच्या पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थकांनी उपस्थित होते.