সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, April 11, 2018

ज्योतिबा फुले यांचे विचार समाजाला मिळालेले अमुल्य भेट:किशोर जोरगेवार

चंद्रपूर/ प्रतिनिधी:
        क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे मराठी भारतीय समाजसुधारक होते. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपले गुरु मानतात. गांधीजींनी त्यांना महात्मा म्हणून संबोधले. स्वातंत्र्यवीर सावरकर महात्मा फुलेंना सामाजिक क्रांतिवीर म्हणत होते.  दलितांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढण्याच्या ध्येयसिद्धीसाठी त्यांना आपले घर सुद्धा सोडावे लागले. गुलामगिरी विरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोध समाजाच्या माध्यमातून त्यांनी गुलामगिरी विरुद्ध सतत लढा सुरु ठेवला होता. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी तळागळातील समाजासाठी शिक्षण पोहचविने हे सत्यशोध समाजाचे ध्येय होते.
        स्त्री स्वातंत्र्य औषधालाही त्रासना-या समाजात त्यांनी आपली अर्धांगिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मुलींच्या शिक्षणाचा भरभक्कम पाया रचला. शेतक-यांचा आसूड हा ग्रंथ त्यांनी लीहिला या सारखे असंख्य ग्रंथ, पवाडे त्यांनी लिहिले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आपल्या समाजाला मिळालेली अमुल्य भेट आहे असे यावेळी जोरगेवार यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी नगरसेवक विशाल निंबाळकर, अमोल शेंडे, अशोक खडके, इरफान शेख, विनोद अनंतवार, विनोद गोल्लजवार, पापु ख्वाजा, विजया बछाव, अँड. कांचन दाते, संतोषी चव्हाण, रवी करमरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.