সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, April 13, 2018

विश्वविक्रमी प्रदीपकुमार सेनची आनंदवन येथे भेट

शिरीष उगे/वरोरा:
 मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथील प्रदीपकुमार मिरदवाल सेन अविवाहित दिव्यांग असून या युवकाचे दि १३ एप्रिल ला चंद्रपूर-भद्रावती वरून आनंदवन (वरोरा) येथे आगमन झाले. 
      प्रदीपकुमार सेन हा इंदोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात डाव्या पाय टोंगड्या पासून गमावल्यानंतरही प्रदीपकुमार नोव्हेंबर 2017 पासून 27 राज्यामध्ये सायकल ने भ्रमण करून घरा घरात स्वच्छते संदेश पोहचविण्याचे सामाजिक कार्याचे कार्य भारतात करीत आहे. प्रदीपच्या पाठीवर 20 किलो ची बॅग,डोक्यावर हेल्मेट त्यावरतीलाईट, आवश्यक कपडे, देशातील सर्व राज्यांचे नकाशे, पाण्याची बॉटल, भेट देत असलेल्या ठिकाणांची नावे असलेले रजिस्टर, आणि सायकल अशा वेशभूषेत प्रदीपकुमार सेन स्वच्छतेचा संदेश घेऊन सायकलने संपूर्ण भारत भ्रमणावर निघाला आहे. देशातील 27 राज्यातून 15000 किलो मीटर चा प्रवास 240 दिवसात विश्वविक्रम करण्याचा मानस असलेल्या या दिव्यांग युवकाचे स्थानिक वरोरा येथील आनंदवन येथे आकस्मिक भेट देऊन अपंग विद्यार्थ्यांना भारत स्वच्छता चे संदेश दिल्ले आणि स्वारानंदन येथे प्रदीपकुमार यांनी गीत गायन केले. विद्यार्थ्यांनी प्रदीपकुमार ला पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या. डॉ विकास आमटे  याच्याशी संवाद साधून शुभेच्छा पत्रक देऊन स्वागत केले. यावेळी सदाशिव ताजने, सुधाकर कडू, गवतम करजगी, डॉ विजय पोळ, दर्शन मोहिते, शिरीष उगे, दीपक शिव, रवींद्र नलगणटीवार, विनोद चिकाटे, हितेश राजनहिरे, नितीन धात्रक, मंजुश्री धात्रक, रक्षा उगे, प्रामुख्याने उपस्थित होते. या शुभेच्छा नंतर सेवाग्राम येथे रावना झाले.




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.