आ. मा.किर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रयत्नाना यश
देश
विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले विदर्भातील प्रमुख पर्यटन स्थळ
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांना पोहोचणे सोयीचे जावे,
तसेच त्यांना लाबांच्या रस्त्याने जाऊन फेरा पडू नये व त्यायोगे वेळ व
पैशांचा अपव्यय होऊ नये यासाठी सोयीचा रस्ता म्हणून नागपूर -हुडकेश्वर
-चारगाव-ठाणा-सावंगी -गिरड- मांगरुळ-केसलाबोडी - खडसंगी -नवेगाव गेट ताडोबा
या ८७ किमी मार्गाला विकसित करून या मार्गाचा दर्जा वाढवून राज्य मार्ग
करण्यात यावा यासाठी गेल्या तीन वर्षापासून सतत प्रयत्न करणारे चिमूर
विधानसभा क्षेत्राचे आ. मा. किर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रयत्नाना यश
प्राप्त होत आहे. नवीन राज्य मार्ग विकसित करण्यात येवून या मार्गाला
दर्जोन्नात करून राज्य मार्ग मंजुरीसाठी प्रयत्न करणारे दूरदृष्टीपूर्ण
युवानैतृत्व आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे कल्पनेनुसार या राज्य
मार्गाचा प्रस्ताव शासनास सादर झाला असून लवकरच मंजुरी मिळण्याची आशा आहे.
हा मार्ग नागपूर ,वर्धा ,चंद्रपूर जिल्ह्यातून जात असून यवतमाळ ,चंद्रपूर
,वर्धा ,नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला आवागमनासाठी सोयीचा ठरणार
आहे. खडसंगी परिसरातील जनतेला नागपूर हे अंतर केवळ ८० किलोमीटर एवढेच
पडणार आहे. या मार्गावर शनिमंदिर, गिरड दर्गा, रामदेगी देवस्थान हि धार्मिक
स्थळे असल्याने येथे येणा-या भाविकांसाठीही हा मार्ग सोयीचा ठरणार आहे.
या
मार्गावरील प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग यांना
दर्जोन्नात करून त्यांना राज्य मार्गाचा दर्जा देऊन या मार्गाला राज्य
मार्ग प्रमाणे विकसित करण्यात यावे यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार
मा. किर्तीकुमार भांगडिया यांनी २०१४ मध्ये मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी
फडणवीस यांना पत्र लिहून, प्रत्यक्ष भेटून विनंती केली होती. त्याचप्रमाणे
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चन्द्रशेखरजी बावनकुळे यांनाही आ.
कीर्तीकुमार भांगडिया यांनी पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेटून विनंती केली. या
मागणीचा सबंधित विभागांचे मंत्री व अधिका-यांकडे आ. किर्तीकुमार भांगडिया
यांनी सतत पाठपुरावा केला. बांधकाम विभागाद्वारे या रस्त्याचा सर्वे
करण्यात येऊन व्यवहार्यता तपासण्यात आली. विविध तपासांती आणि अहवालानंतर
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक विभाग यांनी अवर सचिव(नियोजन)
सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई यांना पत्र क्र. का-प्रआ/१६४३
द्वारे या मार्गाच्या दर्जोनत्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. या
प्रस्तावाचाही आ.मा. किर्तीकुमार भांगडिया पाठपुरावा करीत असून या
प्रस्तावालाही लवकरच मान्यता मिळेल व या मार्गाच्या दर्जोनत्तीचे काम लवकरच
सुरु होईल असा विश्वास आ.किर्तीकुमार भांगडिया यांनी व्यक्त केला.