সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, April 16, 2018

SARD च्या पुढाकाराने टायगर कन्झर्वेशन विषयावर कार्यशाळा संपन्न

चंद्रपूर/प्रतिनिधी:
भारतात दिवसेंदिवस जंगलांचे क्षेत्र कमी होत आहे व लोकांचे जंगलांवरील अतिक्रमण वाढतच आहे. जंगलात लोकांचा हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे वन्य जीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होत आहे. कुठल्याही व्याघ्र प्रकल्पात मोठे झालेले वाघ व इतर वन्यजीव यांना जगण्यासाठी स्थलांतरण करावे लागते. त्यामुळे वन्यजीवांचे तसेच वाघांचे भ्रमणमार्ग हे सुदृढ असणे गरजेचे आहे. या परिस्थितीचा अभ्यास जिल्ह्यातील गाव खेड्यात वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व संस्थाना व्हावा यासाठी “सोशल एक्शन फॉर रुरल डेव्हलप्मेंट (सार्ड)” चंद्रपूर या संस्थेच्या वतीने ‘टायगर कन्झर्वेशन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन स्थानिक आय एम ए सभागृहामध्ये करण्यात आले. यात जिल्ह्यातील विविध संस्थांच्या ९० वन्यजीव प्रेमींनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून मुख्य वनसंरक्षक श्री. विजय शेळके तर अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक श्री. संजयजी ठाकरे, प्रमुख अतिथी म्हणून वाईल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया चे महाराष्ट्र प्रमुख श्री. प्रफुल्ल भाम्बुरकर, सातपुडा फौंडेशन अमरावतीचे अध्यक्ष श्री. किशोर रिठे, चंद्रपूर चे पर्यावरणतज्ञ श्री. सुरेश चोपणे, वाईल्ड लाइफ कन्झर्वेशन ट्रस्ट चे श्री. आदित्य जोशी, सार्ड संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कामडे, 
तसेच जेष्ठ पर्यावरण प्रेमी  श्री. सुर्यभानजी खोब्रागडे हे मंचावर उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरणतज्ञ प्रा. डॉ. योगेश दुधपचारे, वन्यजीव अभ्यासक उदय पटेल, पर्यावरणतज्ञ सचिन वझलवार व जलमित्र संजय वैद्य हे मंचावर उपस्थित होते.
मुख्य वनसंरक्षक श्री. विजय शेळके यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात वन्य जीवांचे रक्षण, त्यांचे अधिवास व भ्रमण मार्ग टिकवून ठेवणे व त्यांना सुदृढ ठेवणे हे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यशाळेत मुख्यत्वे तीन विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यात “ इम्पोर्टन्स ऑफ कोर्रीडोर एंड इट्स मेंटेनन्स” या विषयावर मार्गदर्शन करतांना डब्लू.टी.आय. चे श्री. प्रफुल्ल भाम्बुरकर व श्री. प्रफुल्ल चौधरी यांनी वन्य जीवांच्या भ्रमण मार्गातून जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच कालवे यांचे भयानक परिणाम वन्य प्राण्यांना भोगावे लागते याकडे सर्वांचे लक्ष वेधले. दुसरा विषय “पार्टीसिपेषण ऑफ एन.जी.ओ. इन टायगर कन्झर्वेशन” यावर बोलतांना श्री. किशोर रिठे यांनी वन्यजीव प्रेमींना भविष्यात वन्यजीव क्षेत्रात मोठे काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते तसेच त्यांनी आपसातील मतभेद विसरून सर्वांनी मिळून काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
 तिसरा विषय “इम्पेक्ट ऑफ लिनिअर इन्फ्रास्ट्रक्चर ऑन वाईल्ड लाइफ कारीडोर इन ग्रेटर ताडोबा लेन्ड्स्केप” यावर बोलतांना श्री. आदित्य जोशी यांनी भ्रमण मार्गांच्या अशा प्रकारच्या समस्यांवर उपाय म्हणून ओवरपासेस बांधण्याच्या संकल्पनेची शास्त्रशुद्ध माहिती आपल्या प्रेझेन्टेशन मधून दिली.
या कार्यक्रमाचे यशस्वी संचालन सदानंद आगाबत्तांवर व सौ. सुवर्णा कामडे यांनी तर प्रस्ताविक व आभार प्रदर्शन प्रकाश कामडे यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता सार्ड संस्थेचे सदस्य मंगेश लहामगे, भाविक येरगुडे, विलास माथनकर, प्रवीण राळे, अनुप येरणे, संजय जावडे, आनंद कामडे, रंजन खटी, राजेश पेश, अतुल वाघमारे, महेंद्र राळे, कमलाकर व्यवहारे, दीपक वांढरे यांनी अथक परिश्रम घेतले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.