সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, April 09, 2018

राष्ट्रसंतांच्या वैचारिक वारस्याने समृध्द अशा बेलोराचा इतरांनी आदर्श घ्यावा:हंसराज अहीर

चंद्रपूर/ प्रतिनिधी:
वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वैचारीक वारस्यातुन घडलेल्या बेलोरा या गावाने तंटामुक्त तसेच दारूमुक्त गावाची संकल्पना साकार केल्याने या गावाचा आदर्श घेत अन्य गावातील नागरिकांनी आपल्या
गावाचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व ग्रामविकासाचे वैभव वाढवावे असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी बेलोरा येथे ग्रामजयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित गुरूदेव साधकांना
संबोधीत करतांना केले. दि. 7 एप्रिल रोजी बेलोरा येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात राष्ट्रसंतांच्या ग्रामजयंती उत्सवानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच प्रकाश कुटेमाटे, नायगांवचे सरपंच रोशनी बोबडे, सावंगीचे सरपंच प्रविण पिदूरकर, नायगांवचे माजी सरपंच वामनराव झाडे, प्रमोद लोढे, श्रीराम राजुरकर, आर्तिकाताई राखुंडे, उपसरपंच बेलोरा  ललीताताई भोंगळे, पोलीस पाटील अमोल रेगुंडवार, भाऊरावजी लोढे, योगेश भोंगळे, गजानन वरपटकर, किशोर सुर, गणेश भोंगळे, भाऊराव जुनघरी, मनोहरराव
भोंगळे, सुरेश भोंगळे, दिलीप भोंगळे, अरूण जुनघरी, हरी बरडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

महाराजांनी ग्रामोन्नतीबरोबरच कीर्तन, भजन व प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांमध्ये सत्वगुण रूजविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. स्वावलंबनाचे धडे दिले. चारीत्रयवान पिढी घडविण्यासाठीही राष्ट्रसंतांनी अविरत प्रयत्न
केले. लोकांमध्ये व्यावहारीकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतांनाच राष्ट्रसमर्पित अशा युवकांना संघटीत करून स्वातंत्रय संग्रामात त्यांनी केलेले कार्य ऐतिहासिक असेच होते. ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी जीवनाचा सार सांगितला आहे. ग्रामगीतेच्या माध्यमातून गावाचा उत्कर्ष सहज शक्य असल्याने तिचे पठण, मनन करून ती आचरणात आणल्या गेल्यास गावांची दशा आणि दिशा आमुलाग्र बदलेल असेही आपल्या भाषणात केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. अहीर यांनी सांगितले. प्रधानमंत्राी नरेंद्र मोदी जी यांनी ग्रामीण विकासातून भक्कम अशा
नवभारताचे स्वप्न डोळîासमोर ठेवले आहे. खेड्यांच्या विकासातून देशाच्या प्रगतीचे मोजमाप ठरत असल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील असा प्रयत्न सिंचन, रस्ते, वीज, पेयजल, आरोग्य व शैक्षणिक सुविधांचे जाळे ग्रामीण क्षेत्रात विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून पसरविण्याचे भरीव प्रयत्न केंद्र सरकारने सोबतच राज्य सरकारने चालविले आहे. शेतकऱ्यांच्या  विकासाकरिता संघर्षाची भुमिका सदैव घेतली, त्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक लढे उभारले व शेतकऱ्यांच्या  सोबतीने हे लढे न्याय मिळवून यशस्वी केले  असेही त्यांनी यावेळी सांगितले. सरकारने पाच वर्षात शेतकऱ्यांच्या   उत्पन्नात वृध्दी करण्याचा शब्द दिला आहे.
 एवढेच नव्हे तर त्यांना विविध  योजनांच्या माध्यमातून मकान, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, शेतीपुरक व्यवसाय वृध्दीसाठी भाजीपाला, गोपालन, बकरी पालन, कुकूटपालन, मत्स्यपालन,  मधुमक्षिकापालन यासारख्या व्यवसायावर भर देतांनाच अनेक योजनांच्या  माध्यमातून कर्जपुरवठ्याची सोय केली आहे. याचा लाभ घेत आज शेतकरी समृध्दीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.शेतकऱ्यांच्या जमिनीला कमी भाव मिळणार नाही याची दखल घेतली आहे/  अन्यायाविरूध्द संघर्ष ही भुमिका कायम आहे. शिक्षणाप्रमाणे नोकरी हा  प्रकल्पग्रस्तांचा हक्क आहे त्यासाठी आपण लढा देण्यास नेहमीच सज्ज राहू  असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपला देश हा ग्रामीणांचा देश आहे म्हणूनच  ग्रामीण विकास सोबतच ग्रामीणांचा आर्थिक विकास हेच सरकारचे मुख्य ध्येय  आहे व त्या दिशेने भक्कमपणे वाटचाल सुरू आहे असेही त्यांनी भाषणाअंती  सांगितले.
यावेळी अनेक मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक प्रकाश कुटेमाटे यांनी केले, संचालन शिरपूरकर गुरूजी यांनी  तर आभार प्रदर्शन दिवाकर भोंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राम जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वासीय बांधव तसेच गुरूदेव भक्त मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.