সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, April 30, 2018

चंद्रपुरातील रणरणत्या उन्हात संवेदनशील पत्रकाराची दुचाकीवर फिरती पाणपोई

तहानलेल्या घश्यांचे मसीहा बनले सुनील तिवारी
चंद्रपूर/(ललित लांजेवार):
दरवर्षी जगाच्या नकाश्यावर हॉटसिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपुरातले तापमान म्हंटल कि जीव नको-नको व्हायला लागतो. अश्यातच ४६ अंश तापमानात काम करणार्यांना तहान कित्तेकदा लागते मात्र प्रत्तेक ठिकाणी थंड पाण्याची सोय नसल्याने व कोरडा पडलेल्या घश्याची तहान भागू शकत नाही, सोबतच कडाक्याच्या उन्हात जवळचे पाणी संपले व थंड पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी पैसे नसतील तर. या तहानलेल्या घश्याच्या प्रश्नाचे उत्तर एका चंद्रपूरकर सेवाभावी पत्रकाराने दिले आहे. त्याने आपल्या दुचाकीवर चक्क निशुल्क फिरती पाणपोई सुरु केली आहे.सुनील तिवारी असे या व्यक्तीचे नाव असून ते पत्रकार देखील आहे. 
शहरातील नागरिक व शहरात येणाऱ्या प्रवाशांची तहान भागवण्यासाठी येथील संवेदनशील पत्रकार सुनील तिवारी यांनी एक नवी युक्ती अंमलात आणली असून स्वत:च्या दुचाकीवर वाटसरूंची तहान भागवण्यासाठी त्यांनी सुरु केलेली फिरती पाणपोई सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या पाणपोईच्या माध्यमातून दिवसभर पाणी मोफत देण्यात येत आहे. सोबतच या फिरत्या पानपोईवर "पाणी वाचवा" "जल ही तो कल है" असा संदेश लिहिला असून तिवारी हे पाणी वाचविण्यासाठी जनजागृती देखील करत आहेत. या फिरत्या पाणपोईचा हा पहिलाच उपक्रम असून सुनील तिवारी यांच्या या उपक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे, हा उपक्रम सुनील तिवारी हे प्रत्तेक उन्हाळ्यात राबवीत असून या उपक्रमाला अंगाची लाही लाही करणाऱ्या चंद्रपुरात चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
तहानलेल्यांना पाणी पाजणे हे पुण्यांचे काम समजले जाते. मात्र तहानलेल्यांना थंडगार पण पाजणे हे त्याहून दुप्पट पुण्यांचे काम म्हणावे लागेल. अशेच हे पुण्यांचे काम सुनील तिवारी चंद्रपूरात करत आहेत.
राज्यभर पाणीटंचाई निर्माण झाली असून लोक पाण्यासाठी वणवणतांना दिसत आहे. कुठे साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. मात्र सुनील तिवारी या समाजसेवकाने नागरिक व वाटसरूंना पिण्याच्या पाण्यासाठी कुठेही भटकावे लागणार नाही, याची खबरदारी घेऊन स्वत:च दुचाकीवर दररोज वाटसरूंची तहान या माध्यमातून भागवत आहे. पाण्यासाठी एकीकडे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात आटलेल्या विहिरीत उतरून पिण्याच्या पाण्यासह असल्या नसल्या पाण्यावर भांडे घासत आहे. थेंबभरासाठी भावा-भावात भांडणे सुरू असून बाटलीभर रक्त काढायला निघालेले असताना या उपक्रमाचे महत्व अधोरेखित होते.
या शहरातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून पाणपोईंची संख्या शहरात नसल्यासारखीच आहे. मात्र हे महाशय दुचाकीवर दररोज तहानलेल्या वाटसरूंसाठी जवळपास दररोज ५०० रुपयांचे थंड पाणी वाटून तहानलेल्या घश्यांचे मासिहाच बनले आहे. त्यांच्याकडे चारचाकी असूनही ते चंद्रपुरातील रणरणत्या उन्हात डोक्याला दुपट्टा बांधून दुचाकीने शहरातील कामे करायला आपली फिरती पाणपोई घेऊन निघतात. त्यांची गाडी जेथे जेथे थांबते,किव्हा एखाद्याने चालत्या गाडीला हात दाखविला तरी हे महाशय जागीच गाडी थांबवून तहानलेल्यानची तहान भागवत आहेत. उन्हाळा सुरू होताच शहरात अनेक ठिकाणी सामाजिक संघटनांकडून विविध ठिकाणी पाणपोईचे उद्घाटन करून वृत्तपत्रातून चमकोगिरी केली जाते. मात्र, कोणतीच पाणपोई निरंतर सेवा देऊ शकत नाही.
वाहतूक पोलिसांचे जलमित्र
 ४६ अंश तापमानात वाहतूक पोलिसांची नौकरी म्हणजे चोविस तास तैनात अशीच असते ,अश्यातच तहानलेल्या पोलिसांना देखील सुनील तिवारी यांच्या या फिरत्या पाणपोईची वाट असते, जवळच्या बाटलीतील पिण्याचे पाणी संपले कि पोलीस दादा हे सुनील तिवारीच्या फिरत्या पाणपोईची वाट बघत असतात,जशे ते जवळ आले कि आपल्या गाडीच्या डिक्कीत ठेवलेली खाली बॉटल काढून या फिरत्या पाणपोईच्या पाण्याने भरून घेतात,त्यामुळे चंद्रपुरातील वाहतूक पोलिसांना देखील हक्काचे ‘जलमित्र’ मिळाले आहेत.सुनील तिवारी यांच्या उपक्रमाचे वाहतूक पोलीस फॅन झाले असून अनेक वाहतूक पोलीस त्यांना धन्यवाद म्हणत त्यांच्या सोबत सेल्फी काढत आहेत.  
दिवसभरात ५०० नागरिकांना लाभ
या सर्व संदर्भात ते म्हणाले की, आज घोटभरासाठी माणसाची तडफड बघून लोकसेवेच्या भावनेतून हा उपक्रम राबवताना आनंद वाटतो. शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून पाणपोईची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकतांना अनेकदा बघितले, त्यामुळे विचार केला की, आपल्या हातून सुद्धा काही तरी सेवा या तहानलेल्यासाठी झाली पाहिजे. त्यामुळे स्वखर्चाने दुचाकीला एक लोखंडी ढाचा बसवून त्यात दोन ग्लास व एक थंड पाण्याची २० लीटर क्षमतेची कॅन बसवली आहे. दररोज १० कॅन्समधून दिवसभरात ५०० नागरिकांना याचा लाभ होत आहे.







শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.