সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, April 13, 2018

अज्ञात वाहनाचे धडकेत बिबट जागीच ठार

  1. महामार्गावर दोन वर्षात  चौथी घटणा
  2. गजेंद्र डोंगरे/वार्ताहर-कोंढाळी
  3.  नागपुर -अमरावती राष्ट्रिय महामार्ग क्रमांक सहा वरिल कोंढाळी पासुन 09कि. मी . अंतवरिल  जुनापानी गावापसुन पाचशे मिटर अंतरावर बिबट प्रजातीचा  वन्यप्राणी अज्ञात वाहनाचे धडकेत ठार झाल्याची माहितक महामार्ग सुरक्षा पोलीसांनी कोंढाळी वन परिक्षेत्र अधिकार्यांना  पहाटे 05-35वाजताचे दरम्यान दिली.
     या बाबद मिळालेल्या माहितीनुसार   नागपुर -अमरावती महामार्ग क्र. सहाचे जुनापानी गावानजिकच्या   गोविंदराव किनकर व पंजाबराव किनकर यांचे शेताला लागुन असलेल्या महामार्गावर  13एप्रिल चे पहाटे  अंदाजे साढे चार  चे दरम्यान  एक बिबट महामर्गावर  मृत अवस्थेत पडला  आहे अशी माहिती   महामार्ग सुरक्षा पोलिस  खुर्सापार पोलीस चौकिचे  पोलीस  उमेश तिवारी यांनी कोंढाळी चे वन परिक्षेत्र अधिकारी  एफ आर आजमी यांना दिली. माहिती कळताच वन अधिकार्यांनी आपले सहकारी    राऊंड ऑफिसर एस .बी. मोहोड, आर एन डाखोळे, वन रक्षक  मनोज भस्मे,  योगेश पाटील, वाय. टी. घासले,ए .एम काठमोडे, प्रियंका आवारी  वन मजुर   एस .एन .सोहलिया,आर जे क्षिरसागर,के .टी. कुसळकर, यांना घेऊन  त्वरित घटनास्थळ गाठले,  व  स्थानिय नागरिक गुनवंत खवसे व सदाशिव कोडापे या दोन पंचा समक्ष  घटना स्थळ पंचनामा केला.  यात  अज्ञात वाहनाचे  धडकेत  या बिबट्या तोंडाला जबर मारबसल्याने  बिबट्याचे तोंड व जबडा  रक्तबंबाळ  झाला तर ऊजव्या पायाला जबर दुखापत झालेली असुन शरिराचा अन्य भाग मात्र प्रथम घटनास्थ पंचनाम्यात सुरक्षित अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले आहे.  या बिबट्या चे वय अंदाजे दिड ते दोन वर्षाचे असल्याचे समजले आहे. घटनास्थळ पंचनाम्या नंतर    वन अधिकारी व कर्मचार्यांनी मृत बिबट्याचे शव  वन विश्राम गृह चमेली येथे आनुन वरिष्ठ वन अधिकारी  उप वन संरक्षक  मल्लिकार्जुन व ए.सी. एफ. एस .एन.क्षिरसागर  व वन परिक्षेत्र अधिकारी  एफ आर आझमी यांचे  समक्ष  काटोल तालूका पशुधन विकास अधिकारी डाॅ अनिल ठाकरे  डाॅ अरूण हांडा व डाॅ चेतन  व त्यांचे सहयोगी यांना शव विच्छेदना साठी पाचारन करन्यात आले आहे .
नागपुर अमरावती महामार्गावर    कोंढाळी बाजारगार   परिसरात मागिल दोन वर्षात   तिन वाघ व एक बिबट अज्ञात वाहनांच्या धड़केत ठार झाले आहेत.
 सकाळी 09-30वाजे पर्यंत चा घटनासक्रम.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.