সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, April 05, 2018

प्लास्टिक बंदीनंतरही ५० किलो प्लास्टिक जप्त

चंद्रपूर/रोषण दुर्योधन: 
 राज्यात प्लास्टिक, थर्माकोलवर बंदी असतांना देखील चंद्रपूर शहरातील अनेक दुकानात प्लास्तीलचा वापर सर्हासपने केल्या जात असल्याचे आढळून आल्यावर गुरुवारी मनपा प्रशासनाने गुरुवारी शहरातील गोलबाजारातील दुकानदार, नागरिकांकडून सुमारे ५० किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त केला महापालिकेची ही मोहीम कायम सुरू राहणार असून प्लास्टिकविरोधी मोहीम अधिक तीव्र होत जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त संजय काकडे यांनी दिला. 
 राज्य सरकारनेच १ महिना सवलत दिली असून त्यानंतर म्हणजे २३ एप्रिलनंतर प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे. विकणारे व वापरणारे अशा दोघांनाही यात दोषी धरण्यात येणार आहे.  बंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांवर टाकली आहे. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने यासाठी स्वतंत्र पथकच स्थापन केले आहे. शहराच्या सर्व भागातून सध्या प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात येत आहे.
किरकोळ विक्रेत्यांकडूनही प्लॅस्टिकच्या पिशव्या जमा करण्यात येत आहेत. सरकारने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या आदेशात अद्याप काही गोष्टींबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे काही माल कंपनीमधूनच प्लॅस्टिक पिशवीत बंद होऊन येतो त्याचे काय करायचे याबद्धल अद्याप स्पष्ट आदेश नाहीत, कदाचित तो माल थेट कंपनीमधूनच २३ तारखेनंतर बंद होईल असे दिसते आहे. कंपनीवरच सरकारकडून कारवाई होण्याची शक्यता आहे असे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. 
शहरातील कापड दुकानदार, मॉल्स यांच्याकडून ग्राहकांना सर्रासपणे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून माल दिला जातो. त्यासाठी पैसेही घेतले जातात. त्यांच्यावरही बंदी आहे, मात्र सध्या त्यांना व सर्वांनाच २३ एप्रिलपर्यंत त्यांच्याकडे असलेला साठा नष्ट करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र राज्यात सर्वत्र प्लॅस्टिकचा वापर पुर्णपणे बंद करावाच लागेल, 
प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तू वापरावर बंदी घालण्यात आली असून, दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शहरातील दुकानदारांना प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तू वापरू नये असे आवाहन केले आहे. मात्र आजही अनेक दुकानांत प्लास्टिक, थर्माकोलचा वापर सुरू आहे. त्यामुळे आज स्वच्छता विभागाने गोल बाजारातील दुकानांची तपासणी केली. सुमारे ५० किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त केला.अधिकच्या माहितीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केले असता संपर्क होऊ शकला नाही. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.