चंद्रपूर
जिल्हापरिषदेचे समाजकल्याण सभापती व भाजपचे पदाधिकारी असणारे ब्रिजभूषण
पाझारे यांनी आक्षेपार्य विधान मूल येथे एका कार्यक्रमाप्रसंगी केले होते.
त्याचे पडसाद आज मंगळवारी चंद्रपूरात उमटले असून रिपब्लिकन सेना व बहुजन
रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद येथे ब्रिजभूषण पाझारे
यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या फोटोला काळी शाही लावण्यात आली जिल्हा परिषदेच्या बाहेर फोटोला काळे फासण्यात आले . तसेच
ब्रिजभूषण पाझारे मुर्दाबादचे नारे सुद्धा लावण्यात आले.
मूल
येथील"शाहू फुले आंबेडकर विचारमंच" च्या कार्यक्रमात डाॅ. आंबेडकर यांचे
प्रमाणेच सुधीर मुनगंटीवार काम करीत असून सुधीरभाऊत मला बाबासाहेब आंबेडकर
दिसतात" असे वादग्रस्त वक्तव्य केले.या विधानामुळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
यांचा अपमान झाला असून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये
तक्रारही दाखल केली आहे.