
देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ आणि उन्नाव बलात्कार घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळावा कायद्यात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी चंद्रपुरात कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते, कठूआ येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात कॅन्डल मार्च निघत आहे. देशातील लाखो नागरिकांप्रमाणे आपल्याला वेदना झाल्या. ज्याप्रमाणे महिलांना वागणूक मिळत आहे. यापुढे मिळता कामा नये. हिंसाचाराच्या विरोधात आणि न्यायाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने निघणाऱ्या कॅन्डल मार्चमध्ये सामील व्हा. असे आव्हाहन गेल्या २ दिवसापासून जिल्यात सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात होते. यात whatsapp चा जास्त वापर करून जास्तीत जास्त लोकांपारीयंत हा
कॅन्डल मार्चमध्ये सहभागी व्हा असे आव्हाहन करण्यात आले होते, त्यामुळे यात शहरभरतील तरुण तरुणाई,महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते,हा कॅन्डल मार्च गांधीअ चौक चंद्रपूर येथून निघून संपूर्ण शहराच्या प्रमुख मार्गावरून निघाला.यात हजारोच्या संख्येने लोक we want justice म्हणत हाक देण्यात आली
.(छायाचित्र:गोलू बाराहाते,ETC)
