सिंदेवाही/प्रतिनिधी:
तळोधी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले आणि सिंदेवाही येथील रहिवासी असलेले
पोलीस हवालदार यांच्या घरी कोणी नसल्याने संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या
घरात डल्ला मारला यात ९२ हजार ४०० रुपयाचा सोने,व यासह चांदीचा ऐवज लंपास केला.या प्रकरणात
सिंदेवाही पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. सिंदेवाही येथील कॉलनी परिसरात राहत असलेले जनार्दन मांदाळे यांचे घरी कुणी
नसल्याने चोरट्यांनी भरदुपारी दोन वाजताच्या सुमारास दरवाज्याचा ताला तोडला व दिवानात ठेवलेल्या सोन्याचे मंगळसुत्र, चांदीचा करंडा, लक्ष्मीची मुर्ति यासह किरकोड मौल्यवान वस्तूनसह एकूण ९२ हजार ४०० रुपयाचा ऐवज चोरला .
कुटुंबिय काही वेळानंतर घरी आल्यानंतर प्रकरण उजेडात आले. या प्रकरणी सिंदेवाही पोलीसांत तक्रार
दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेमुळे पोलीसाच्याच घरी झाल्याने संपूर्ण परिसरातील नागरिकात आश्चर्य व्यक्त
केला जात आहे.