সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, April 06, 2018

हंसराज अहीर यांच्या यशस्वी प्रयत्नामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याना जुन्या करारनुसार मोबदला

चंद्रपूर/प्रातिनिधी:

 पौनी - 3 भुमीगत खदान 2 खुली खदान व चिंचोली रिकाॅस्ट प्रकल्पासंदर्भात नव्या कायद्याला  घेवुन (एक्स.एल.ए.आर.आर.) प्रकल्पग्रस्त  बांधवामध्ये जमिनीच्या मोबदल्याबाबत व्यक्त होत असलेला संभ्रम जो वेकोलि  अधिकाऱ्यांनी  बेजबाबदारपणाचा कळस गाठून या संभ्रमाला अधिक पसरविल्यानेप्रकल्पग्रस्तांमध्ये वाढीस लागलेल्या असंतोषाची त्वरीत दखल घेवुन केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज  अहीर यांनी ज्या प्रकल्पात सी.बी.  अॅक्ट 1957 अन्वये 14(1) च्या प्रावधानानुसार जमिनीच्या मोबदल्याबाबत करार कार्यवाही पुर्ण झाली आहे. तसेच ज्या ठिकाणी करारनामे झालेले नाहीत.  मात्रा सेक्शन 9 ची अधिसुचना यापुर्वीच लागु झाली आहे. अशा प्रकल्पग्रस्तांवर मोबदल्याबाबत अन्याय होवु देणार नाही असे अभिवचन दिले होते. व याबाबत केंद्रीय कोळसा मंत्राी यांचेशी या अन्यायाबाबत चर्चा  करून ना. अहीर यांनी या प्रकल्पग्रस्तांना प्रतीएकरी 6, 8 व 10 लक्ष  रूपयांचा मोबदला मान्य करणारे कोळसा मंत्रालयाचे दि. 30 मार्च, 2018 रोजी  पत्रा निर्गमीत करवून घेतल्याने या खाण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी  फटाक्यांची आतीषबाजी करून व मिठाई वाटून केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे रक्षण केल्याबद्दल त्यांचा  भव्य सत्कार करित या विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राजुरा येथील शासकीय विश्रामगृहात जनसंपर्क दिन कार्यक्रमाचे औचित्य साधत या मंत्रालयीन निर्णयामुळे पौनी - 3, चिंचोली रिकाॅस्ट या प्रकल्पासह सास्ती यु/जी, निलजई, उकणी अशा  एकुण 7 प्रकल्पातील  प्रकल्पग्रस्तांनासुध्दा लाभ मिळाल्याने या सर्व प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेत्कार्यांनी या कार्यक्रमास हजेरी लावुन ना. अहीर यांच्या स्वागतामध्ये सहभाग दर्शविला होता.
या कार्यक्रमास आ. अॅड. संजय धोटे, राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बांेडे, जिल्हा उपाध्यक्ष अरूण मस्की, जिल्हा महामंत्राी राहुल सराफ, तालुका अध्यक्ष सुनिल उरकुडे, भाजपा विस्तारक सतिश दांडगे, जेष्ठ नेते मधुकर
नरड, किसान आघाडीचे महामंत्राी राजु घरोटे, विनायक देशमुख, महिला आघाडी अध्यक्षा सौ. सुनंदा डोंगे, आदिवासी नेते वाघुजी गेडाम, शहर अध्यक्ष बादल  बेले, जिवती तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी आदी प्रभृतींची उपस्थिती होती. 
याप्रसंगी केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. हंसराज अहीर यांनी वेकोलि  अधीकार्यांच्या  भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करित त्यांनी  मोबदल्यासंदर्भात केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल आपल्या भाषणातुन खरपूस  समाचार घेतला. वरकरणी माहितीच्या आधारे या अधिकाÚयांनीच शेतकÚयांचा  असंतोष वाढविण्यास हातभार लावला असे सांगत शेतकÚयांचे हित जोपासणे हाच  लोकप्रतिनिधी म्हणून आपला धर्म आहे. शेतकर्यांवरील  अन्यायाविरूध्द कधीही  गप्प बसणार नाही. शेतकÚयांच्या सोबतीने त्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव संघर्ष करू अशी ग्वाही त्यांनी या सत्कारप्रसंगी दिली. कोळसा  मंत्रालयाच्या अध्यादेशाचा 7 प्रकल्पातील शेतकऱ्यांना   जुन्या करारानुसारच  मोबदल्याची राशी मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.  याप्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अॅड. संजय धोटे विचार व्यक्त  करतांना म्हणाले की, ना. हंसराज अहीर सतत प्रश्नांचा पाठपुरावा करणारा लोकाभिमुख नेता असुन शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी सोडविण्यात त्यांचे  मोठे योगदान आहे. त्यामुळेच प्रकल्पग्रस्त शेतकÚयांना त्यांनी करोडो  रूपये मिळवुन देत प्रकल्पबाधीत असलेली अनेक गावे आर्थिकदृष्ट्या संपन्न  केली आहेत. हक्काची नोकरी सुध्दा त्यांच्या प्रयत्नातून मिळवुन दिली गेली  आहे.
जनसंपर्क दिन कार्यक्रमात भेंडाळा मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ना. अहीर यांची भेट घेवुन त्यांना आपल्या समस्यांबाबत अवगत  केले. यावेळी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना याप्रकरणी तात्काळ  चैकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.  या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजयुमोचे सचिन डोहे, बंडु बोडे, सचिन  शेंडे, पं.स. सदस्या कु. नैना परचाके, नगरसेवक राधेश्याम अडाणीया,  नगरसेविका सौ. उज्वला जयपुरकर, नगरसेविका सौ. प्रिती रेकलवार, मंगेश
श्रीराम, दिलीप गिरसावळे, रूपेश चिडे, सिन्नु पांजा, मिलींद देशकर, लखन जाधव, प्रदिप मोरे, मोहन कलेगुरवार, आशिष करमरकर आदींनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे संचालन तालुका महामंत्राी अॅड. प्रशांत घरोटे यांनी तर प्रास्तावीक राहुल सराफ यांनी केले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.