সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, April 09, 2018

एव्हरेस्ट शिखरावर चंद्रपूरचे नाव कोरणाऱ्या विद्यार्थ्यांना हंसराज अहिर घडवून आणनार राष्ट्रपतींची भेट

Invite him to 'The President' | ‘त्यांना’ राष्ट्रपतींच्या भेटीचे आमंत्रणचंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूरच्या विविध आश्रमशाळेतील १० विद्यार्थी एव्हरेस्ट शिखरावर स्वारी करण्यासाठी सिध्द झाले आहेत. या १० विद्यार्थ्यांची केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी सकाळी विश्रामगृहावर भेट घेतली. त्यांना मोहीम फत्ते झाल्यानंतर राष्ट्रपतींची नवी दिल्ली येथे भेट घालून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
चंद्रपूरच्या बोर्डा, देवाडा व जिवती या तीन आश्रमशाळेतील १० आदिवासी विद्यार्थी १० एप्रिलपासून हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या बेस कॅम्पवरुन महिनाभराच्या एव्हरेस्ट मोहिमेला सुरुवात करणार आहेत. एक वर्षाच्या सात टप्प्यातील प्रशिक्षणानंतर ही मुले गिर्यारोहण मोहिमेसाठी सिध्द झाली आहे. या मोहिमेवर आश्रमशाळेतील आकाश चिन्नु मडावी, शुंभम रविंद्र पेंदोर, छाया सुरेश आत्राम, इंदू भाऊराव कन्नाके, कविदास पांडूरंग काटमोडे, मनिषा धर्मा धुर्वे, प्रमेश शिताराम आडे, आकाश मलाका आत्राम, उमाकांत सुरेश मडावी, विकास महादेव सोयाम हे विद्यार्थी जाणार आहेत. रविवारी येथील प्रियदर्शिनी सभागृहामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सकाळीच मुलांची भेट घेतली. त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांना एव्हरेस्ट मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली. यावेळी महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, गोंदियाचे सीईओ राजा दयानिधी, प्रकल्प अधिकारी केशव बावनकर आदी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.