সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, April 23, 2018

ग्राम स्वराज्य अभियानात १०६ घरे उजळली

 सहा गावांचे शंभर टक्के विदुयतीकरण पूर्ण
नागपूर/प्रतिनिधी:
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजने अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य सुरु करण्यात आलेल्या ग्राम स्वराज्य योजनेत  नागपूर परिमंडलात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील ६ गावातील  १०७ घरे मागील आठ्वड्यात महावितरणकडून जोडणी देऊन गरीब गावकऱ्यांची घरे प्रकाशमान करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागपूर परिमंडलात कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांच्या मुख्य उपस्थितीत सावनेर तालुक्यातील रामपुरी येथे योजनेचा शुभारंभ करण्यात आला.  सावनेर तालुक्यातील रामपूरी येथील  उकठराव नागपुरे आणि लक्ष्मण वरखेडे या दोन वीज ग्राहकांना कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे , नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या मुख्य उपस्थित वीज जोडणी देण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य सुरु करण्यात आलेल्या ग्राम स्वराज्य योजनेत ज्या गावात ८० टक्के पेक्षा जास्त जनता दलित आहे आणि गरीब कुटुंबातील आहे अश्या गावातील सर्व घरांचे विदुयतीकरण करण्याची योजना महावितरणकडून आखण्यात आली होती . राज्यात अश्या गावाची संख्या १९२ तर नागपूर जिल्ह्यात ४ गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला होता.  जिल्ह्यातील महावितरणच्या कन्हान उपविभागात येणाऱ्या सिहोरा , भिवापूर उपविभाग येणाऱ्या धुरखेडा  आणि सावरगाव उपविभागातील खेडी-गवरगोंडी येथील १२  वीज ग्राहकांना ग्राम स्वराज्य योजनेत वीज जोडणी मागील आठवड्यात देण्यात आली. यात रामपुरी गावात २४,सिहोरा येथे १६, धुरखेडा येथे ५० जोडण्या विशेष मोहीम घेऊन देण्यात आल्या. या शिवाय वर्धा जिल्ह्यातील पुलगाव तालुक्यातील हिवरा येथे ४ तर कवठा  येथे १ वीज जोडणी मोहिमेत देण्यात आली.
ग्राम स्वराज्य योजनेमुळे  योजनेमुळे वरील सर्व ६ गावात गावात ३१ मार्च २०१८ पूर्वी असलेल्या सर्व घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे आणि नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी वरील मोहीम यशवीपणे राबवून केवळ एक आठड्यात वरील सर्व ६ गावात विदुयतीकरणाचे काम १०० टक्के  पूर्ण केले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.