সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, February 22, 2014

मतदारांच्या नोंदीसाठी संकल्पपत्राचा प्रयोग

चंद्रपूर-आर्णी मतदार संघ : अंतिम यादीत १७,१४,१८६ मतदार


मतदार नोंदणीत महिला पिछाडीवर

मतदार नोंदणीमध्ये महिला मात्र पिछाडीवर आहेत.
 जिल्ह्यात महिलांचे प्रमाण दर हजारी ९१५ असताना मतदार यादीत मात्र महिलांची नोंद कमी आहे. 

लोकसंख्येनुसार, ७५ टक्के मतदारांची नोंद असली तरी २२ टक्के नोंद अद्याप बाकी आहे. 
९१ टक्के ओळखपत्रांचे वाटप
जिल्ह्यातील सहाही मतदार संघातील मतदारांना आजवर ९१.९१ टक्के ओळखपत्रांचे वाटप 

प्रारूप यादीतील १६ लाख ७ हजार ९0८ मतदारांपैकी १५ लाख ४९ हजार ९९0 मतदारांना ओळखपत्रे 

मतदारांजवळ केवळ ओळखपत्र असून चालणार नाही. तर यादीत नाव असणेही तेवढेच आवश्यक आहे. ओळखपत्र असूनही यादीत नाव नसेल तर मतदान करता येणार नाही. पण, यादीत नाव असूनही ओळखपत्र नसेल अशा वेळी मतदान करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्यासाठी मतदाराला आपली ओळख पटवावी लागेल. हे टाळण्यासाठी मतदार यादीत नाव आहे अथवा नाही याची खात्री करावी, नाव नसल्यास प्रपत्र क्रमांक ६ भरून नाव नोंदणी करून घ्यावी, सोबतच ओळखपत्रही काढून घ्यावे. त्यासाठी सर्व तहसिल कार्यालयात व्यवस्था उपलब्ध आहे.

 मतदान केंद्र १,९४९
राजूरा विधानसभा ३४२
चंद्रपूर विधानसभा ३१५
बल्लारपूर विधानसभा ३३९
वरोरा विधानसभा ३0३
वणी विधानसभा ३0७
आर्णी विधानसभा ३४३
एकूण केंद्र १,९४९


चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील मतदार नोंदणीची आणि प्रशासनाच्या प्राथमिक तयारीची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने संकल्पपत्राचा छापील मजकूर पाठविला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून हे संकल्पपत्र भरून घेतले जाणार आहे. त्यासाठी राजकीय चळवळीशी संबंधित नसलेले दोन विद्यार्थी कॅम्पस अँम्बेसेडर म्हणून प्राचार्यांनी निवडायचे आहेत. त्यांच्या माध्यमातून या संकल्पपत्राची मोहीम राबवायची आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे हा यामागील, हेतू आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदारांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात यावेळी १८ ते २0 वयोगटातील ४३ हजार ९९२ नवमतदारांची वाढ झाली आहे. असे असले तरी, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना यात पुन्हा २५ ते ३0 हजार नवमतदारांची वाढ अपेक्षित आहे. हा आकडा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडूनही उपाय योजले जात आहेत. ३१ जानेवारीला प्रकाशित झालेल्या अंतीम मतदार यादीमध्ये या लोकसभा मतदार संघात १७ लाख १४ हजार १८६ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यात पुन्हा वाढ होण्याची अपेक्षा त्यांनी वर्तविली.
मतदार यादींचे पुनरिक्षण सुरू असून मतदारांच्या नावाची वगळणी आणि दुरूस्तीही सुरू आहे. २ हजार ६५0 बॅलेट युनिट इव्हीएम आणि २ हजार ४४६ कंट्रोल युनिट इव्हीएम उपलब्ध आहेत. रिंगणातील उमेदवार १५ पेक्षा अधिक असल्यास अधिकच्या इव्हीएमची गरज पडू शकते. त्यासाठी व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.