সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, February 04, 2014

बस दरीत कोसळली; १0 ठार

कोल्हापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळील घाटात सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान खासगी प्रवासी बस पन्नास फूट दरीत कोसळून बसचालकासह १0 जण ठार तर ४0 जण जखमी झाले. तर या अपघातानंतर घाटात झालेल्या वाहतूक कोंडीदरम्यान कंटेनर एका कारवर आदळून कारचा चेंदामेंदा झाल्याने त्यातील काही प्रवाशांचीही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. अपघातग्रस्त बस गुजरातची असल्याने मृत प्रवासी गुजरातचे असल्याची शक्यता आहे. रात्री उशीरापर्यंत त्यांची नावे कळू शकलेली नव्हती.
कन्याकुमारीची सहल आटोपून मुंबईकडे जाणार्‍या गुजरातच्या पोरबंदरमधील प्रवासी बसने सोमवारी रात्री खंबाटकी बोगदा पार केला. त्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने एस आकाराच्या धोकादायक वळणाच्या बाजूच्या दरीत बस कोसळली. प्रवाशी जीवाच्या आकांताने ओरडू लागले. त्यामुळे अनेकांनी त्यांची वाहने रस्त्यावरच थांबविली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन एक कंटेनर रस्त्यावर उभ्या असलेला टेम्पो व जीपला धडकला. कंटेनर बाजूच्याच एका कारवर आदळला. त्यात कारचा चेंदामेंदा झाला. कारमधील दोघा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदश्रींचे म्हणणे आहे, मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नव्हता. स्थानिकांनी कारमधील जखमींना खंडाळा ग्रामीण रुग्णालयात हलविले. अंधारामुळे बसमध्ये नेमके किती प्रवासी दगावले आहेत. याची माहिती रात्री उशीरापर्यंत मिळालेली नव्हती.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.