সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, February 23, 2014

परिचय- स्वच्छ प्रतिमेचे संजय देवतळे

परिचय-

स्वच्छ प्रतिमेचे संजय देवतळे 
जकारणात अतिशय मृदूभाषी व सरळमार्गी म्हणून ओळखल्या संजय देवतळे… माजी मंत्री दिवंगत दादासाहेब देवतळे यांचे पुतणे असलेले संजय देवतळे गेल्या चार टर्मपासून भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. शालेय शिक्षणानंतर अगदी वारसाहक्काने त्यांच्याकडे राजकारण चालत आले. त्यांनीही या संधीचा फायदा घेत मतदारसंघात चांगली लोकप्रियता मिळवली. देवतळे घराणे आधीपासून ज्येष्ठ नेते शांताराम पोटदुखे यांच्याशी एकनिष्ठ म्हणून ओळखले जाते. म्हणूनच पोटदुखे हे संजय देवतळे यांचे राजकीय गुरू, अशी ओळख जिल्हय़ाच्या राजकारणात निर्माण झाली व ती आजतागायत कायम आहे.
गेल्या अकरा वर्षांपासून पुगलिया गट सत्ताकारण व संघटनेवर पकड ठेवून आहे. मात्र, दोन टर्मपासून त्यांना खासदारकीपासून दूर व्हावे लागण्याने देवतळे आणि वडेट्टीवार गट सक्रिय झाला. दीड- दोन वर्षापासून देवतळे यांना कबिने मंत्रीपद मिळाले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहाण यांच्या मंत्रीमंडळात त्यांना पर्यावरण, सांस्कुतिक खातेची जबाबदारी आहे.
मंत्रीपदचा पत्ता अनेकदा कापला गेला. मात्र पृथ्वीराज चौहाण हे मुख्यमंत्री होताच त्यांचे मित्र शांताराम पोटदुखे यांनी वजन वापरून मंत्री पद मिळविले. देवतळे जेव्हा दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळावे म्हणून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भरपूर प्रयत्न केले. पण प्रत्येक वेळी पुगलिया गटाने दिल्लीतून त्यांच्या नावावर फुली मारण्यात यश मिळवले. विलासरावांच्या पहिल्या कार्यकाळात देवतळे यांचा मंत्रिमंडळातील समावेश अगदी निश्चित झाला होता. त्यांच्यासाठी शांताराम पोटदुखे दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटून गळ घालून आले होते. तरीही विस्ताराच्या दोन दिवस आधी देवतळे यांना नकार कळवण्यात आला. मंत्रीपद देऊ शकलो नाही, याचे शल्य असलेल्या विलासराव देशमुखांनी मग देवतळेंना वनविकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले. विलासरावांच्या दुसऱ्या कार्यकाळात पुन्हा एकदा देवतळेंच्या मंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाची यादी घेऊन विलासराव दिल्लीला गेले, तेव्हा त्यात देवतळे यांच्या नावाचा समावेश होता. मंत्रिमंडळाचा विस्तार ज्या दिवशी होणार होता त्या दिवशी सकाळी देवतळे यांचे नाव मंत्रीपदाच्या यादीत असल्याचे वृत्त वाहिन्यांवरून जाहीरही झाले. अखेरच्या क्षणी मात्र पुन्हा देवतळे यांना राजकारणाने दगा दिला. पुगलिया गटाने जोरदार मोर्चेबांधणी केल्यामुळे हे घडले असे नंतर सर्वाना ठाऊक झाले.
अशोक चव्हाण यांच्याकडे राज्याच्या नेतृत्वाची धुरा आल्यानंतर पुन्हा एकदा देवतळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. या नावाला विरोधी गटाची हरकत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यातील नेत्यांनी विजय वडेट्टीवारांचा मंत्रिमंडळात समावेश करून घेतला. देवतळेंच्या तुलनेत वडेट्टीवार तसे कनिष्ठच, पण त्यांना अचानक लॉटरी लागली. देवतळे यांच्या मंत्रीपदाचा कार्यकाल अगदी चांगला गेला. मात्र स्वगृह असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कमालीची नाराजी आहे. हा सारा संदर्भ ठाऊक असतानाही माजी खासदार नरेश पुगलिया यांचा पत्ता कट करून देवतळे यांना खासदार करायचेच, असा चंग बांधला आहे. त्यासाठी फिल्डिंगही बरोबर लागली गेली. आता उमेदवारी फायनल असल्याचे सांगण्यात येत आहे.
----------------------------------------------------------------
प्रतिमा- मृदूभाषी व सरळमार्गी, 
आर्थिक व्यवहार- गैरप्रकार नाही, वृत्तपत्रांना जाहिराती नाही 
प्रसिद्धी लालसा नाही।  वृत्तपत्रांना प्रसिद्धी पत्रके नाही
विकास काम- मतदार संघात नियमित दौरे, आवश्यक सुविधा 
^^^^^^^^^^^^^^^^ 
भविष्यात लोकसभेत फायदे -
वरोरा- भद्रावती विधान सभेतून चांगला प्रतिसाद
राजुरा, कोरपणा, गोंडपिपरीतून संमिश्र  प्रतिसाद
राजुराचे आमदार सुभाष धोटे हे देवतळे यांचे नातलग 
वणी-आर्णीतून कांग्रेसच्या भरवशावर  प्रतिसाद
----------------------------------------------------------------
नुकसान 
माजी खासदार नरेश पुगलिया कडून सहकार्य मिळण्याची शक्यता कमी- त्यामुळे चंद्रपूर विधानसभेत फारसा प्रतिसाद मिळनार नाही. 
----------------------------------------------------------------
विधानसभा २००९- वरोरा 

 उमेदवार                  पक्ष              मतदान            टक्के 
1 संजय देवतळे           कांग्रेस          51904         33.26%
2 राजू देवगडे             बसप              7304             4.68%
3 सुरेश धानोरकर शिवसेना            48164           30.86%
4 अरुण कापते          SVRP *         1120                 0.72%
5शरद कारेवर          SBP *                1797              1.15%
6ताराबाई काळे        RWS *              527                 0.34%
7 दत्ता कोम्बे            मनसे                   2855             1.83%
8 ताराया शेख        A IUDF *           310                     0.2%
9 धनराज विरुतकार  SP *             624                        0.4%
10 मुरलीधर वांढरे    GGP           936                           0.6%
11 अनिल बुजोने                                30982                   19.85%
12 असलम मिस्त्री                             593                       0.38%
13 अशोक घोडमारे                                 654                 0.42%
14 नाना देवगडे                                   2177                    1.39%
15 मोहमद शेख                                     647 0.                 41%
16 रुपेश घगि                                       2992                  1.92%
17 हितेश राजान्हिरे                           34 2483                  1.59%
----------------------------------------------------------------------
पुरुष मतदार मतदार महिला मतदार मतदान टक्के 
120629 109725 230354 156069 67.75%

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.