बुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात धामणगाव तालुक्यातील तीन सरपंचांसह चार जण जागीच ठार झाले आहेत. स्कॉर्पिओ गाडी झाडावर आदळून हा अपघात झाला. त्यात आणखी चार जण गंभीर जखमीही झालेत.
जळगाव इथं होणा-या सरपंच महापरिषदेत सहभागी होण्यासाठी धामणगाव रेल्वे तालुक्यातील सहा सरपंच आणि एका सरपंच महिलेचे पती स्कॉर्पिओ गाडीनं निघाले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीच्या एमआयडीसीजवळून जात असताना, त्यांची कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. ही धडक एवढी भयंकर होती की, त्यात चार जण जागीच ठार झाले. त्यापैकी तिघे सरपंच आहेत, तर सरपंच महिलेच्या पतीचाही मृत्यू झालाय.
जुना धामणगावचे सरपंच प्रवीण देविदास गुल्हाने (४२), ढाकूळगावचे सरपंच मंगेश वामन म्हात्रे (३९), वाटोलाचे सरपंच नरेंद्र बहुरूपी (४०) आणि अरविंद ताळे (४५) अशी मृतांची नावं आहेत. जखमींमध्ये अनिता अरविंद ताळे, अतुल कुणबे, योगिता कोकाटे आणि ड्रायव्हर प्रवीण भालवी यांचा समावेश आहे. त्यांच्यावर बुलडाणा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघाताच्या बातमीनं चांदूर रेल्वे तालुक्यात शोककळा पसरली आहे.