সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, February 11, 2014

दुकाने निरीक्षक बोरकर निलंबित

शासकीय चालान पुस्तिकांबाबतचा हलगर्जीपणा भोवला


प्रतिनिधी / चंद्रपूर
येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये कार्यरत दुकाने निरीक्षक रमेश आर. बोरकर यांनी सही व शिक्के असलेले कोरी शासकीय चालान पुस्तिका कार्यालयात जतन करून न ठेवता खासगी व्यक्तींकडे दिली. याबाबतचा भांडाफोड विदर्भ प्रहार कामगार संघटनेचे अध्यक्ष अँड. हर्षल कुमार चिपळूणकर यांनी केला. याबाबतची तक्र ार वरिष्ठ स्तरावर केल्यानंतर दुकाने निरीक्षक रमेश बोरकर यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. सोबतच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत.
येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय मागील अनेक दिवसांपासून या ना त्या कारणावरून वादग्रस्त ठरू लागले आहे. सोमवार (३0 डिसेंबर) २0१३ ला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातच दोन दलालांच्या हातात परवान्यासाठी लागणार्‍या शेकडो चालान पावत्या आढळून आल्याने येथील सहा. कामगार आयुक्ताचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. जिल्ह्य़ातील उद्योगांमध्ये कार्यरत कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणार्‍या विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्षा अँड. हर्षलकुमार चिपळुणकर यांनी या दलालांचा पर्दाफाश केला. याबाबतची तक्रार उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव भुजबळ यांच्याकडे दाखल करताच येथे कार्यरत सर्व अधिकारीवर्ग ऑफिस बाहेर पळाले होते, हे विशेष.
कंत्राट परवाना, शॉपर्स परवान्यासाठी लागणारे सरकारी चालान पावत्यांचे गठ्ठे दोन दलालांकडे असल्याची माहिती मिळताच अँड. चिपळुणकर यांनी त्यांचा पर्दाफाश केला. त्यांचेकडून जवळपास ४ ते ५ गठ्ठे ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कामगार आयुक्तांकडून तक्रार झाल्यानंतरच याबाबतची दखल घेऊ, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर कामगार आयुक्ताकडे तक्र ार दिली. पण या गंभीर बाबीकडे सर्वांनीच कानाडोळा केला होता. त्यानंतर वरिष्ठस्तरावर अँड. चिपळूणकर यांनी तक्र ार नोंदविली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत शासनाने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरिक्षक बोरकर याना तडकाफडकी निलंबित केले. यासोबतच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना निलंबन कालावधीत खासगी नोकरी स्वीकारता येणार नाही किंवा व्यापार, उद्योगधंद्यात गुंतवून ठेवण्यास बंधन घालण्यात आले आहे. जर निलंबन कालावधीत बोरकर यांनी खासगी नोकरी स्वीकारली किंवा व्यापार उद्योगधंद्यात गुंतवून घेतले तर त्यांचे गैरवर्तन केल्याचे समजण्यात येईल आणि ते निर्वाहभत्यास अपात्र ठरतील, असेही आदेशात म्हटले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.