সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, February 16, 2014

चंद्रपुरतील महाविद्यालयांना कुलुप ठोकणार

प्रहार संघटना

चंद्रपुर -प्रहार विद्यार्थी संघटनेतर्फे दि.14 फेब्रु.पासुन गोंडवाना विद्यापिठाच्या भोंगळ कारभार,भरमसाठ फी व मुजोर प्रशासना विरोधात साखळी उपोषण सुरु आहे.  उद्या दि.17 फेब्रुवारी रोजी चंद्रपुरातील गोंडवाना विद्यापिठाअंतर्गत येणार्या महाविद्यलयांना कुलुप ठोकण्याचे आंदोलण करण्यात येईल.


विद्यापिठ सुरु झाल्यापासुन अनेक विद्यार्थ्यांना भोंगळ कारभाराची झळ बसलेली आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुध्दा वाया गेलेले आहे.न्याय मागायला गेल्यास कुलगुरु पासुन प्रशासनातील बाबु पर्यंत कोणीही एकुन घ्यायला तयार होत नाही.केवळ विद्यार्थीच नव्हे तर अनेक संस्था चालक सुध्दा विद्यापिठ प्रशासनाच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारा मुळे त्रस्त आहेत.नुकत्याच कंम्युटर सांयंस व मॅनेजमेंट च्या निकाला मुळे या प्रश्नाने पुन्हा एकदा गंभीर स्वरुप धारण केलेले आहे.
विद्यापिठाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे 500 विद्यार्थ्यांचे शैक्षणीक वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण झालेला असतांना कुलगुरु व विद्यापिठ प्रशासन काही घडलेच नसल्याचा अविर्भावात वागत आहेत.प्रहार विद्यार्थी संघटनेच्या साखळी उपोषणावर निर्णय न झाल्यामुळे या आंदोलनाला प्रहार चे चंद्रपुर जिल्हाप्रमुख पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात अति-तिव्र करण्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.उद्या चवथ्या दिवशीही विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण सुरु राहणार आहे अशी माहिती प्रहार विद्यार्थी संघटनेचे अरविंद गौतम, अब्दुल शेख, कार्तिक झोया, मंगेश शेवणे,निलेश पाझारे,अक्षय येरगुडे,सतिश मिश्रा जॉन्सन जे यांनी दिली.आजच्या उपोषणात श्रावणी साखरकर, अदिती करिये, दिनेश मिसार, पंकज घरात,सुचंदा साहु,आशिष बनकर,अझरुद्दीन काझी, मयुरी सहारे, किशोर जुनघरे,स्वप्निल तरलवार, आशिष बनकर, पलाश पाटील इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


सकाळी 7 पासुन कुलुप ठोकणार :
 उद्या दि.17 फेब्रुवारी रोजी चंद्रपुरातील गोंडवाना विद्यापिठाअंतर्गत येणार्या महाविद्यलयांना कुलुप ठोकण्याचे आंदोलण करण्यात येईल.विद्यार्थ्यांचे भविष्यासोबत खेळणारे,त्यांचे आर्थिक ब मानसिक शोषण करणारे महाविद्यालय बंद करण्याकरिता हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती प्रहार चे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांनी दिली.या आंदोलनाला जे प्राचार्य-संस्थाचालक सहकार्य करतील त्यांना चरणस्पर्ष करुन आभार व्यक्त करण्यात येईल.परंतु जे संस्थाचालक प्राचार्य आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या घरापुढे ढोल वाजवुन निषेध करण्यात येईल अशी सुध्दा माहिती देश्मुख यांनी दिली.


गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना जाहीर आवाहन : 
प्रहार तर्फे दि.18 फेब्रुवारी रोजी विद्यापिठाला घेराव टाकण्यात येणार आहे. दि.18 रोजी स्वंयफुर्तीने महाविद्यालय बंद ठेवुन विद्यापिठाला घेराव घालण्यासाठी उपस्थित राहावे असे जाहीर आवाह्न गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना करण्यात आलेले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.