সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, February 28, 2014

दारूबंदीसाठी अॅड.पारोमिता गोस्वामी संतप्त

सावली - सावली येथे श्रमिक महिला मतदार अधिवेशनाचा निरोप देण्यासाठी सावली येथे अॅड. पारोमिता गोस्वामी यांची सभा घेण्यात आली. या सभेत लोकप्रतिनिधींच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. 
सावली येथील ग्रामपंचायत सभागुहात अॅड. पारोमिता गोस्वामी यांची जाहीर सभा घेण्यात आली. सभेत बोलतांना चंद्रपूर जिल्हयातील महिला दारूबंदीसाठी चिवट लढा देत आहेत. स्वातंत्र्यदिनी महिलांनी जेलभरो आंदोलन केल्याने पोलीसांनी अटक केली व महिला 7 दिवस तुरूंगात असतांना जिल्हयातील आमदार व
खासदारांना महिलांची आठवण का झाली नाही व निवडणुकीच्या वेळेसच आठवण येत असल्याचा संतप्त सवाल उपस्थित करून महिलांनी याचा जाब उमेदवारांना व पक्षाच्या कार्यकत्र्याना विचारण्याची गरज आहे असे सांगीतले. तंटामुक्ती अध्यक्ष शोभा बोगावार यांनीही सावलीत दारूमुळे अनेक संसार उध्वस्त झालेले
आहे, लहान मुलीची हत्या, दारूडया मुलाच्या त्रासापायी बापाच्या हातुन खुन झाल्याची घटना घडली असल्याचे उदाहरणे देऊन दारूबंदीची गरज असल्याचे सांगीतले. कार्यक्रमात सुधाकर गाडेवार, पं.स.सदस्य चंदा लेनगुुरे,
साधना वाढई, वसंतराव राईंचवार, विजय सिध्दावार, विजय कोरेवार, कोतकोंउावारजी गुरूजी, दयाबाई गेउाम, कुंदा गेडाम, ज्योती राऊत, शोभाबाई वाढई, भास्कर आभारे, राजेश व्यास आदी मान्यवरांनी निराधारांचे प्रश्न, जबरानजोत, राशन, घरकुल या प्रश्नांवरही मार्गदर्शन करून 8 मार्चला श्रमिक
महिला मतदार अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन अनिल मडावी यांनी केले तर आभार किरण शेंडे हिन मानले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.