সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, February 15, 2014

प्रहार विद्यार्थी संघटनेचे साखळी उपोषण

प्रहार विद्यार्थी संघटनेचे आज दि.14 फेब्रु.2014 पासुन जटपुरा गेट येथिल महात्मा गांधी पुतळ्या जवळ साखळी उपोषन सुरु झालेले आहे.गोंडवाना विद्यापिठा अंतर्गत येणार्या कंम्प्युटर सायंस व मॅनेजमेंट च्या कॉलेजमधिल विद्यार्थ्यांचे ईंटर्नल मार्क्स जसेच्या तसे देण्यात यावे,विद्यापिठातील भरमसाठ शुल्क,भोंगळ कारभार बंद करावा इत्यादी मागणासाठी हे आंदोलन सुरु करण्यात आलेले आहे.येत्या 17 तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास विद्यापिठाला घेराव घालण्याचे आंदोलन प्रहार तर्फे करण्यात येणार आहे.विशेष म्हनजे महाविद्यालयाच्या चुकीमुळे व कुलगुरुंच्या हेकेखोरपणामुळे मुळे 89 कॉलेज मधिल अंदाजे 400 विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.या विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भुमिका प्रहार ने घेतलेली आहे.


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाचे विभाजन करुन मागासलेल्या चंद्रपुर-गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता गोंडवाना विद्यापिठाची स्थापना करण्यात आली.मात्र या विद्यापिठातुन सुविधा कमी व शोषन जास्त असा अनुभव विद्यार्थ्यांना येत आहे.वास्तविक 90 टक्के विद्यार्थी अतीमागासलेल्या चंद्रपुर-गडचिरोली जिह्यातील असल्यामुळे परिक्षा शुल्क माफ करण्याची भुमिका घेणे गरजेचे असतांना राज्यातील सर्वात जास्त परिक्षा शुल्क या विद्यापिठाकडुन आकारण्यात येत आहे.नागपुर विद्यापिठातुन वेगळे केल्यामुळे गोंडवानाच्या विद्यार्थ्यांना इमिग्रेशन फी,इलिजिबिलिटी फी यातुन सुट देणे गरजेचे आहे.मात्र कुलगुरु काहीही एकुन घ्यायला तयार होत नाही.पुनर्मुल्यांकनासाठी भरमसाठ शुल्क आकारणे,पुनर्मुल्यांकनात पास होऊनही परिक्षा शुल्क परत न करणे,दोन वर्षे लोटुनही पुस्तकांची यादी प्रकाशित न करणे असे अनेक गैरप्रकार या विद्यापिठात होत आहेत.या सव गैर-प्रकाराच्या विरोधात प्रहार विद्यार्थी संघट्नेने आंदोलनाची सुरुवात केलेली आहे.
साखळी उपोषणा मध्ये प्रहार वि.सं.चे पुर्व विदर्भ संघटक अरविंद गौतम,जिल्हाध्यक्ष अब्दुल हबिब शेख,उपाध्यक्ष कार्तिक झोया,सचिव अक्षय येरगुडे,श्रीकांत डबले,मोंटु कातकर,गोलु तन्नीरवार,अविनाश शेटे,अजित चौबे,महेंद्र चौधरी यांच्यासह अक्षय अर्कलवार,पलाश पाटील,स्वप्निल तलकवार,अदिती करिये,स्नेहा सिंगाळे,अक्षता पाटील,सुचंदा साहा इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.