সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 16, 2013

शेतकरीहिताचा आत्मा इंग्रजीत

देवनाथ गंडाटे
चंद्रपूर  : सात महिन्यांपूर्वी १२ हजार रुपये खर्चून सुरू करण्यात आलेल्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या संकेतस्थळाचे नियमित अपडेशन झाले नाही. शिवाय शेतक-यांना न समजणा-या इंग्रजी माहितीमुळे या संकेतस्थळाचा आत्माच हरविला आहे.

हे संकेतस्थळ बघण्यासाठी 


कृषी उत्पादन वाढ आणि शेतक-यांचे उत्पादन, उत्पादकता आणि उत्पन्न वाढ, कृषी संशोधन, तंत्रज्ञान निर्मिती यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून कृषी विस्तार विभाग, कृषी विद्यापीठे, कृषीशी संलग्न इतर विभाग, शासकीय यंत्रणा, खासगी यंत्रणा, सेवाभावी संस्था यांच्या कृतिशील सहभागातून कृषी विस्तार सहाय्य अधिक प्रभावी गतीमान करण्याचा उद्देश होता. २०१०-११ पासून ही योजना सुधारित आत्मा म्हणून जिल्हास्तरावर सुरू करण्यात आली. जिल्हास्तरावर अधीक्षक कृषी अधिकारी पदाचे प्रकल्प संचालक, प्रकल्प उपसंचालक, लेखा नि लिपिक, ही महत्वाची पदे भरण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून आत्माचे कार्यालय वडगाव येथे स्वतंत्र इमारतीत गेले. आत्माने एक पाऊल पुढे टाकत मे २०१३ मध्ये जिल्ह्याचे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले. मआत्मा चंद्रपूरङ्क या संकेतस्थळाचे उद्घाटन पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते थाटात करण्यात आले. या संकेतस्थळामुळे शेतक-यांपर्यंत माहिती-तंत्रज्ञान पोहोचल, असे सर्वांनाच वाटले. मात्र, यातील सर्व माहिती इंग्रजीत असल्याने सामान्य शेतक-यांना काहीही एक ङ्कायदा झालेला नाही. संकेतस्थळाच्या मुखपृष्टावर आंबा आणि धानाचे चित्र आहे. शिवाय जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर आणि प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांचे छायाचित्र दिसते. गेल्या सात महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या संकेतस्थळावर केवळ जिल्हाधिका-यांचे छायाचित्र आणि काही कार्यक्रमांचे छायाचित्र प्रकाशित करण्यापलिकडे कोणतेही नवे अपडेशन झाले नाही. नागपूर येथील खासगी वेबडिझाइनरकडून हे संकेतस्थळ बनविण्यात आले असून, निर्मिती आणि वर्षभराच्या देखभालीसाठी १२ हजार रुपये देण्यात आले.
आत्मा योजनेचे प्रमुख उद्देश शेतकरी हिताचे आहेत. मात्र, संकेतस्थळावरील माहिती इंग्रजीत असल्याने शेतक-यांना त्याचा लाभ घेणे कठीण झाले आहे. जिल्ह्यातील बोटावर मोजण्या इतक्या शेतक-यांना मराठी लिहिता-वाचता येते. त्यात इंटरनेट ही सुविधा दूरच राहिली आहे.

  • काय हवे?
  • जिल्हा नियामक मंडळाची यादी व कार्य
  • आत्मा व्यवस्थापन समितीची यादी व कार्य
  • आत्माला दुवा साधणा-यांची माहिती
  • आत्माचा उद्देश आणि कार्य
  • विविध उपक्रम आणि यशोगाथा
  • आर्थिक मदतीची माहिती आणि नियोजन
  • वार्षिक कृती आराखडा, कृषी सल्ला
  • किसान एसएमए सेवा
  • जिल्ह्याची कृषीविषयक सांख्यिकी माहिती



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.