पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच घेण्यात आलेली ‘टीईटी’ या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जानेवारी अखेरपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी दिली. या परीक्षेच्या निकालापूर्वी उमेदवारांना आलेल्या अनेक शंकांचे निरसन करण्यासाठी परिषदेने त्यांच्याकडून अभिप्राय आणि आक्षेपही मागविले आहेत. सर्व आक्षेपांचा परिषदेकडून विचार करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय परीक्षा मंडळाच्या धर्तीवर राज्य परीक्षा परिषदेने ‘टीईटी’च्या परीक्षेत देण्यात आलेले प्रश्न व त्यांच्या उत्तरांची सविस्तर यादी परीक्षा परिषदेने आपल्या संकेतस्थळावर नुकतीच टाकली आहे. यामुळे निकालापूर्वीच प्रत्येक उमेदवारांना आपल्या चुका आणि त्यातील उत्तरांची माहिती मिळत आहे. मात्र, त्याहूनही काही शंका अथवा आक्षेप असल्यास त्याचाही विचार परिषदेच्या तज्ज्ञांकडून करण्यात येणार आहे. १५ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या टीईटीच्या परीक्षेला राज्यभरातून ६ लाख २१ हजार ११५ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. मात्र, त्यापैकी ५ लाख ९१ हजार २६५ विद्यार्थीच परीक्षेला बसले