সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, December 24, 2013

परिवर्तनासाठी घेणार आपचा झाडू

परिवर्तनासाठी घेणार आपचा झाडू

दिल्लीच्या राजपटावर पहिल्यांदाच सत्तेची मास्टर चाबी आपल्या टोपीत पाडणा-या आम आदमी पक्षाची भुरळ चंद्रपुरातही दिसून येत आहे. अनेक इच्छुक तरुण कार्यकर्ते येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपचा झाडू हाती घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजप वगळता इतर पक्षाला लोकसभा आणि विधानसभेत जाता आले नाही. केवळ शेतकरी संघटनेला दोनदा आमदार मिळविता आला. गत लोकसभा निवडणुकीत तिसरा पर्याय म्हणून बसप आणि शेतकरी संघटना उभ्या होत्या. मात्र, मतदारांनी जुन्याच पक्षाच्या नेत्यांना पसंती दिली. मात्र, विकासाच्या दृष्टीने कोणतेही पावले उचलली गेली नाहीत. गेल्या अनेक वर्षांपसून न सुटलेल्या समस्या आतातरी सुटाव्यात, यासाठी मतदारदेखील नवा पर्याय शोधत आहे. जिल्ह्यात तरुण नेते तयार होऊ लागले आहेत. वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटनेमार्फत विकासाच्या मुद्द्यावर मोर्चे, आंदोलने करून समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न हे तरुण करू लागले आहेत. त्यामुळे मतदारांना नव्या तरुणांवरील विश्वास वाढू लागला आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत नवख्या आप पक्षाने प्रस्थापित पक्षांचा झाडूने सङ्काया करीत सत्तेची मास्टर चाबी आपल्या हाती घेतली. त्यामुळे मआपङ्कची हवा चंद्रपुरातही पोहोचली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मआपङ्कच्या माध्यमातून उमेदवारी मिळविण्यासाठी दिल्ली, मुंबई आणि नागपुरात बैठका सुरू झाल्या आहेत. भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर, वकील, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांतील कार्यकर्ते व पदाधिकारी मआम आदमी पार्टीङ्ककडे आशेने बघू लागले आहेत. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची व्यूहरचना आखण्यात आली. राज्य ते ग्रामपातळीपर्यत कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. या पक्षात उमेदवाराची शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, चारित्र्य, संपत्ती आदींविषयी माहिती असेल. सर्व माहिती वेबसाइटवर उपलब्ध राहणार असून, एखाद्या सदस्याच्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीविषयी कुणाला माहिती असल्यास ते ऑनलाइन तक्रार करू शकतात.

चाचपणी सुरू
शहरातील विविध संघटना आणि काही प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना आप पक्षाविषयी विचारणा केली असता सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते संपर्कात असून, चाचपणी सुरू असल्याचे एका पदाधिकाèयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

सोशल नेटवर्किंगचा फायदा
शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक तरुणाच्या हातात मोबाईल आला आहे. त्यामुळे एसएमएसच्या माध्यमातून तरुणांना जोडण्याचे काम सुरू होते. आता ङ्केसबुकने ही जागा घेऊन परिवर्तनाची दिशा तरुणांना पटवून देत आहे.

पक्ष.....  .मनपा.........नपा.......जिप.......पंस....एकूण
काँग्रेस...  २६..........५०........२१........४५.....१४२
भाजप.... १८.........२५.......१८........३१.... ९२
राष्ट्रवादी.....४.......१७.........७........१३......४१
शिवसेना....५........१८.........२.........२......२७
बसप.........१........५.........१..........१.......८
मनसे.......१.......१..........१..........१.......४
अपक्ष.......११....८..........७.........२१.....४७
भाकप......०......२..........०............०.....२
शेतकरी संघटना...०..५..........०............०.....५
रिपाइं...........०......१..........०............०.....१
भारिप..........०.........३..........०............०.....३
                ६६.....१३५......५७.....११४.........३७२

स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस बलाढ्य पक्षजिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस बलाढ्य पक्ष आहे. एकूण ३७२ जागांपैकी एकट्या काँग्रेसकडे १४२ जागा आहेत.
 

  • काँग्रेस ३८%
  • भाजप २४%
  • राष्ट्रवादी काँग्रेस ११%
  • शिवसेना ७%
  • बसप २%
  • मनसे १%,
  • अपक्ष १२%
  •  शेतकरी संघटना १.३ %,
  • भाकप ०.५ %,
  • भारिप ०.८%,
  • रिपाइं ०.२ %,

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.