संमेलनाध्यक्षपदी उत्तम कांबळे |
चंद्रपूर, - बहुजन कर्मचारी साहित्य संसदेच्या वतीने चौथे बहुजन साहित्य संमेलन येत्या ८, ९ व १० फेब्रुवारी रोजी चांदा क्बल मैदानावर होत आहे. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, संपादक उत्तम कांबळे राहणार असून, उद्घाटन विचारवंत गेल आम्वेट यांच्या हस्ते होईल. स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी ऍड. कुणाल घोटेकर यांनी स्वीकारली आहे. संमेलनात डॉ. भारत पाटणकर, प्रा. प्रभाकर पावडे, प्रा. जैमिनी कडू यांचे मार्गदर्शन होईल. ८ फेब्रुवारीला सकाळी उद्घाटन सोहळा, सायंकाळी साडेचार वाजता ‘भाकर’ हे पथनाट्य, सायंकाळी सहा वाजता ‘भारतीय भक्ती व मुक्तीचा लढा’ यावर परिसंवाद, रात्री ९ वाजता प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांचा ‘अंगार व शृंगार’ हा कार्यक्रम होईल. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विदर्भाचा बुलंद आवाज, दुपारी साडेबारा वाजता परिसंवाद, दुपारी साडेतीन वाजता ‘बाबासाहेब का जागले, का रडले’ यावर नाट्य, सायंकाळी पाच वाजता परिसंवाद, सायंकाळी सात वाजता कीर्तन, रात्री नऊ वाजता कविसंमेलन होईल. १० फेब्रुवारी रोजी सकाळी व दुपारी परिसंवाद, सायंकाळी साडेसहा वाजता जागर समतेचा हा कार्यक्रम होईल.