चंद्रपूर- जिल्ह्यात मुलीच्या जन्मदरात जिवती तालुका अव्वल असून, ३२९ मुलांमागे ३६९ मुली असा जन्मदर आहे. जिवती तालुक्याची टक्केवारी १२१.६ असून, त्या खालोखाल गोंडपिपरी तालुक्याचा क्रमांक लागतो. गोंडपिपरी २३८ मुलांमागे २६७ मुली असा जन्मदर आहे. विशेष म्हणजे जिवती व गोंडपिपरी हे दोन्ही तालुके अतिदुर्गम भागात मोडतात.
एप्रिल-ऑक्टोबर २०१३ या दरम्यान जिल्हा आरोग्य विभागाने ही आकडेवारी गोळा केली असून, चंद्रपूर जिल्ह्यात ८४८६ मुलांमागे ८१४४ मुलींचा जन्मदर आहे. म्हणजे ९५९.७ टक्के हा जिल्ह्याचा जन्मदर आहे. तालुकानिहाय जन्मदर खालीलप्रमाणे आहे. बल्लारपूर ३७७ मुले ३३९ मुली, भद्रावती ३८८ मुले ३५८ मुली, ब्रम्हपुरी ५५६ मुले ५३७ मुली, चंद्रपूर २९७५ मुले २८८३ मुली, चिमूर ५२२ मुले ४७६ मुली, गोंडपिपरी २३८ मुले २६४ मुली, जिवती ३२९ मुले ३६९ मुली, कोरपना ४३२ मुले ४३१ मुली, मूल ३३३ मुले ३६० मुली, नागभीड ४३९ मुले ४०३ मुली, पोंभुर्णा १२६ मुले १०६ मुली, राजुरा ३०८ मुले २८४ मुली, सावली ३८७ मुले ३७० मुली, सिंदेवाही ३९६ मुले ३०२ मुली आणि वरोडा ६८० मुले ६६५ मुली. जिल्हा आरोग्य विभागाने प्रसारित केलेली ही आकडेवारी जिवती, गोंडपिपरी, मूल, कोरपना या तालुक्यात मुलींचा जन्मदर आशा दर्शविणारा आहे.