সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 26, 2013

माळढोकच्या पाठीवर ‘रेडिओ कॉलर’

चंद्रपूर- नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याचे संवर्धन करण्यासाठी त्याच्या पाठीवर ‘रेडिओ कॉलर’ बसवण्याचा पहिला प्रयोग चंद्रपूर जिल्ह्य़ातील आष्टी गावात यशस्वीपणे पार पडला. वाघ आणि बिबटय़ा या प्राण्यांना ‘रेडिओ कॉलर’ बसवून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे उपक्रम सुरूच असताना जगात पहिल्यांदाच एका पक्ष्याचा अशाप्रकारे माग काढण्यात येत असल्याने या प्रयोगाला मोठे महत्त्व आले आहे. या प्रयोगांतर्गत, कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून माळढोकच्या संवर्धनावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

उरले फक्त अकरा!
जगाच्या पाठीवरून माळढोक पक्षी हळूहळू दुर्मीळ होत चालले आहेत. आजच्या घडीला जगात केवळ ३०० माळढोक पक्षी शिल्लक राहिले आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ात माळढोक पक्षाची गणना दर महिन्याला केली जात आहे. ऑगस्ट महिन्यापासून हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली असून वरोरा तालुक्यात आठ तर लगतच्या भद्रावती तालुक्यात तीन माळढोक पक्षाची नोंद घेण्यात आली आहे. त्यातही चार मादी व उर्वरित नर आहेत.

त्यांना वाचवण्यासाठी..
नामशेष होत असलेल्या या प्रजातीचे जतन करून संख्या वाढवण्यासाठी वन खात्याने पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी वरोरा तालुक्यातील आष्टी गावातील एका माळढोक पक्षाच्या पाठीवर ‘रेडिओ कॉलर’ लावण्याचा प्रयोग यशस्वी करण्यात आला. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे अभ्यासक डॉ. हबीब बिलाल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या परिसरातील अन्य माळढोक पक्षांना सुध्दा अशाच पध्दतीने कॉलर लावली जाणार आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.