चंद्रपूर: नव्या वर्षाची चाहूल लागली आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना जिल्ह्यात खून, दरोडे आणि महिला अत्याचाराच्या घटनांनी सन २0१३ हे वर्ष गाजले. पोलीस प्रशासनावर गुन्हेगारी वरचढ झाल्याचे पोलीस दफ्तरी असलेल्या नोंदीवरून दिसून येते. गुन्ह्यात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली असली तरी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ८२ टक्के आहे. गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रणमिळविण्यात पोलीस सपेशल अपयशी ठरले.
सन २0१३ या वर्षात जिल्ह्यामध्ये खुनाच्या ३४ घटना घडल्या. सन २0१२ मध्ये ४९ खुनाच्या घटना घडल्या होत्या. खुनाचा प्रयत्न करणे २४, दरोडा पाच, जबरी चोरी ४९, घरफोडी २0२, चोरी ७३३, गंभीर स्वरूपाची दुखापत करणे ५९६, दंगल ९६, बलात्कार ८२, विनयभंग १४८, विश्वासघात करणे ३९, फसवणूक ६३, सरकारी कर्मचार्यांवर हल्ला करणे ४६, हयगयीची कृत्ये २४७ व अन्य ९८0 गुन्ह्यांची नोद झाली. एकूण गुन्ह्यांची सख्या तेन हजार ३४४ आहे.
यातील खून व खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटनांमध्ये सन २0१२ च्या तुलनेत घट झाली असली तरी अन्य गुन्ह्यात मात्र मोठी वाढ झाली आहे. एक वर्षापूवी दिल्लीतील 'निर्भया' च्या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला. मात्र त्यानंतरही महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाली नाही. सन २0१२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात बलात्काराच्या ४५ घटना घडल्या होत्या. मात्र सन २0१३ मध्ये या घटना दुपटीने वाढल्याचे दिसून येते. या गुन्ह्यांची संख्या ८२ आहे.
पूर्वी अशा घटनांच्या तक्रारी करण्यासाठी महिला पुढे येत नव्हत्या. मात्र 'निर्भया' हत्याकांडानंतर देशभर झालेल्या आंदोलनामुळे महिलांमध्ये बळ आले. त्यातूनच आता महिला पुढे यायला लागल्या आहेत. त्यामुळे गुन्ह्यांच्या संख्येत वाढ दिसून येत असल्याचे एका पोलीस अधिकार्याने सांगितले. एकूणच विविध गुन्हेगारीच्या घटनांनी सन २0१३ हे वर्ष चांगलेच गाजले. पोलीस विरुद्ध कामगार संघर्ष गाजला
भद्रावती येथील कर्नाटका एम्टा या कंपनीच्या विरोधात कामगारांनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलीस विरुद्ध कामगार असा संघर्ष सुरू झाला. आंदोलक कामगार कुटुंबांची अटक व कामगार नेत्याला जबर मारहाण केल्याच्या आरोपाने पोलीस प्रशासन अडचणीत आले. हे सारे सरत्या वर्षात घडले.