देवयानी यांची संयुक्त राष्ट्र महासंघात बदली
अमेरिकेतील भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक झाली. त्यांच्या अटकेचे पडसाद भारतासह जगभरात उमटत आहेत. चंद्रपूर जिल्ह्याची सुपुत्री देवयानी खोब्रागडे हि ओळख अनेकांना ठाऊक नाही. मात्र, देवयानी हि महाराष्ट्र कॅडरचे निवृत्त आयएएस अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या कन्या आहेत. उत्तम खोब्रागडे हे मूळचे मुल येथील रहिवाशी आहेत.

1999च्या बॅचच्या आयएफएस (इंडियन फॉरेन सर्व्हिसेस) अधिकारी आहेत. सध्यात्यांची नियुक्ती न्यूयॉर्कमध्ये भारतीय उच्चायुक्तालयातील उपउच्चायुक्त म्हणून आहे. याआधी त्या पाकिस्तान, इटली आणि जर्मनी येथे कार्यरत होत्या.
देवयानी यांचे प्राथमिक शिक्षण जळगाव सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, जळगाव येथे झाले. त्यानंतर मुंबईत माउंट कॉर्मेल स्कूल आणि सेठ जी.एस. मेडीकल कॉलेज आणि केईएममधून एमबीबीएस पूर्ण केले. 2012 मध्ये रोल्स रॉइस सायन्स अँड इनोव्हेशन लिडरशिप प्रोग्रामसाठी त्यांची निवड झाली. येथे त्यांनी त्यांचे ज्ञान आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यांचे पती तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत. देवयानी यांना दोन मुली असून मोठी मुलगी सहा वर्षांची तर छोटी तीन वर्षांची आहे. देवयानी यांना प्रवास, संगीत, नृत्य, योगा यांची विशेष आवड आहे.