झाडीबोली साहित्य मंडळाकडून दरवर्षी दिल्या जाणार्या झाडीबोलीतील उत्कृष्ट वाङमय पुरस्कारांची घोषणा आसगाव येथील झाडीबोली साहित्य मंडळाच्या नवीन शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी केली. हे पुरस्कार ११ जानेवारीला प्रदान करण्यात येणार आहेत.
यंदाचा पुरस्कार द. सा. बोरकर स्मृती काव्य पुरस्कार (लोकराम शेंडे, लोकरामायण), गजानन बागडे स्मृती कादंबरी पुरस्कार (हिरामन लांजे, आठवणीतले गावकूस), मनराज पटेल स्मृती कादंबरी पुरस्कार (पांडुरंग कांबळे, पाराकाष्ठा) आणि सुभाष चांदुरकर कथा पुरस्कार (डोमा कापगते, गावगाड्याच्या गोष्टी) यांना मिळणार आहे. झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. हरीशचंद्र बोरकर यांनी या सर्व पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून पवनीजवळील आसगाव येथे ११ व १२ जानेवारीला होऊ घातलेल्या एकविसाव्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.