चिमूर- तालुक्यातील भिसी पोलिस स्टेशन हद्दीतील जांभूळघाट पासून २ कि. मी. अंतरावरील मेटेपार येथील निवासी पुष्पा भोजराज गुरुनुले या ४0 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. हा खून अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नातून झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. महिलेच्या शरीरावरील सोन्याचे दागिने गायब असून, गळय़ावर जखमा आढळल्या. ही घटना काल शुक्रवार(१३ डिसेंबर) च्या रात्री घडली.
मेटेपार निवासी पुष्पा भोजराज गुरुनुले या महिलेची घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे चिमूरला आठवडी बाजारासाठी घरचे तांदूळ विकण्यासाठी आली होती. बाजार झाल्यानंतर रात्रीच्या दरम्यान चिमूर-ब्रम्हपुरी बसने जांभूळघाट येथे उतरून आपल्या स्वगावी पायदळी जात असताना जांभूळघाट पासून २ कि. मी. अंतरावर शेतशिवारात काही इसमांनी गाठले. एकटी असल्याची संधी साधून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तीने आरडाओरड केल्याने अज्ञातांनी तिचा गळा दाबून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत काही अंतरावरील शेतशिवारात नेवून ठेवल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
महिलेची हत्या करून मंगळसुत्र तोडून ते पसार झाले तर तिच्या पायातील पादत्राणे व पिशवीत ४५0 रुपये व भाजीपाला घटनास्थळी मिळाला. महिलेने मारेकर्यांचा प्रतिकार केल्याचा प्रयत्न घटनास्थळावरील पायाचे ठसे व शरीरावर असलेल्या जखमावरून आढळून येते. परंतु, आपले पितळ उघडे पडू नये, यासाठी भीतीपोटी मारेकर्यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा संशय व्यक्त क रण्यात येत आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू यांनी भेट देवून पाहणी केली. पोलिसांनी भादंवी ३0२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.