रस्त्यावरील धुळ प्रदुषण निंयत्रणात आणण्याची मागणी
चंद्रपुरः शहरातिल रस्त्यावरील धुळ-प्रदुषण नियत्रणात आणण्याकरिता विवीध मागण्याकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिका विरोधात आज इको-प्रो तर्फे ‘एक दिवसीय बैठा सत्याग्रह’ करण्यात आला.
शहरातील रस्त्यावर होणाÚया धुळ प्रदुषणामुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याने जाणारे पादचारी, सायकल-मोटरसायकलस्वार, फेरीवाले तसेच रस्त्याच्या दुतर्फा असणारे दुकाने यांना या धुळीमुळे प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात इको-प्रो तर्फे महानगरपालिकेला तसेच संबधीत विभागांना सुध्दा वेळोवेळी निवदने देण्यात आली.
शहरातील धुळ प्रदुषण नियत्रंणात आणण्याकरिता महानगरपालिकेकडुन कुठलेच प्रयत्न होत नसल्याने आज ‘इको-प्रो पर्यावरण विभाग’ व ‘इको-प्रो महानगरपालिका विभाग’ यांच्या वतीने नितीन रामटेके, इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख व संदिप इंगोले, इको-प्रो महानगरपालिका विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आज ‘एक दिवसीय बैठा सत्याग्रह’ करण्यात आला. सदर बैठा सत्याग्रह गांधी चैक येथे नविन महानगरपालिका इमारतीसमोर करण्यात आला. यावेळी बैठा सत्याग्रह मंडपास चंद्रपूर शहर महानगरपालिकाचे, स्थायी समीती, सभापती श्री रामु तिवारी यांनी भेट दिली. इको-प्रो च्या पदाधिकारी यांचे सोबत मागण्यासंदर्भात चर्चा करित, रस्त्याचे डांबरीकरण व सिमंेटीकरण येत्या तिन-चार महिन्यात करण्यात येणार असुन, बैठा सत्याग्रहाच्या मागण्याची तातडीने पाठपुरावा करून त्या पुर्णपणे सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन रामु तिवारी यांनी दिले.
बैठा सत्याग्रहानंतर इको-प्रो तर्फे श्री प्रकाश बोखड, आयुक्त, मनपा यांना विवीध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. इको-प्रो तर्फे करण्यात आलेल्या एक दिवसीय बैठा सत्याग्रहास इको-प्रो च्या विवीध विभागाचे विभाग प्रमुख सहभागी झाले होते. यात नितीन बुरडकर, वन्यजिव विभाग प्रमुख, धर्मेद्र लुनावत, पोलीस विभाग प्रमुख, राजु पाटील, बाबुपेठ विभाग प्रमुख, सुभाष शिंदे, आरोग्य विभाग उपप्रमुख यांनी सहभाग घेतला.
सत्याग्रहाच्या यशस्वितेकरिता इको-प्रो पर्यावरण विभागाचे प्रज्ञा सराफ, सुमीत कोहळे, इको-प्रो महानगरपालिका विभागाचे रविद्र गुुरनुले, किशोर वैद्य, विद्या इंगोले, ओम वर्मा, जितेद्र वाळके, राजु पाटील, मनिष गांवडे, निलेश दौडकर, अक्षय खनके, अभय अमृतकर, हेमंत बुटटन, राजेश व्यास, सुनिल पाटील, दिनेश अतकर आदीनी सहकार्य केले.