चंद्रपूर - 22 डिसेंबर रोजी होणा-या विक्रीकर निरीक्षक पूर्व परिक्षा-2013 दरम्यान केंद्राच्या परिसरात जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कलम 144 लागू केली आहे. त्या अनुषंगाने परिक्षा केंद्राच्या परिसरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुहास एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
सदर परिक्षा केंद्राच्या 100 मिटर क्षेत्राअंतर्गत नियिमत व रोजचे वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालीना प्रतिबंध राहील, उपरोक्त कालावधीत परिक्षा दिनी परिक्षा केंद्राच्या 100 मिटर क्षेत्रअंतर्गत झेरॉक्स फॅक्स, ई मेल, मोबाईल फोन आणि इंटरनेट सवलती किंवा अन्य कोणतेही कम्मुनिकेशन सवलतीवर प्रतिबंध राहील.
सदर आदेश डॉ.आंबेडकर कॉलेज तथा कामर्स आणि सायन्स चंद्रपूर, भवानजी भाई चव्हाण हायस्कुल व कनिष्ट महाविद्यालय मूल रोड चंद्रपूर, रफी अहमद किदवाई मेमोरिलय हायस्कुल तथा कनिष्ट महाविद्यालय घुटकाळा वार्ड, जनता विद्यालय डॉ.वासलवार यांचे दवाखान्याजवळ, शांताराम पोटदुखे लॉ कॉलेज ताडोबा रोड तुकूम, सेंट मायकल इंग्लिश स्कुल मिशन नगीना बाग, न्यू इंग्लिश हायस्कुल तथा ज्यु कॉलेज जयंत टॉकीज जवळ मेन रोड, जिल्हा परिषद माजी शासकीय ज्युबली हायस्कुल तथा ज्युनिअर कॉलेज चंद्रपूर, श्री साई तंत्रनिकेतन नागपूर रोड चंद्रपूर, सरदार पटेल महाविद्यालय गंज वार्ड, हिंदी सिटी हायर सेंकडरी स्कुल कस्तुरंबा रोड व विद्या विहार कॉन्व्हेट हायस्कुल छत्रपती नगर तुकूम चंद्रपूर या ठीकाणी लागू राहील.