शनिवारीदेखील दिवसभर थंडीचा जोर वाढला होता . पहाटेपासून पडलेली कडाक्याची थंडी सकाळपर्यंत कायम होती. तर दिवसभर थंड वारे वाहत होते. ऐन दुपारी सावलीत उभे राहिले की गारठा जाणवत होता. गारवा वाढविणारे वारे वाहू लागले होते.
हवामान खात्यानुसार, सध्या काश्मिर खोऱ्यात जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. यामुळे उत्तर भारत व उत्तर भारतातील पूर्व भागात शुष्क व थंड वारे वाहत आहेत. हे वारे थेट विदर्भावर आदळत असल्याने येथील पाऱ्यात घसरण होत आहे. गुरूवार-शुक्रवारच्या रात्री गोंदिया व नागपुरात पारा पहिल्यांदाच दहा अंशाखाली गेला. दोन्ही शहरात अनुक्रमे १० व १०.८ अंश सेल्सिअस तापमान होते. त्यापाठोपाठ अमरावतीत पारा ११.६ अंश सेल्सिअस होता. उत्तरेतील थंड वाऱ्यांमुळे विदर्भात दिवसाही गारवा आहे. सर्वत्र कमाल पाऱ्यात तीन ते पाच अंशांची घसरण झाली आहे. हा पारा सरासरीच्या दोन अंश कमी आहे. सर्वात कमी २५.३ अंश सेल्सिअस तापमान गोंदियात नोंदविले गेले. तर नागपुरात पारा २७.३ अंश सेल्सिअस होता. विदर्भाला येत्या ४८ तासांत थंडीच्या लाटेचा विळखा पडण्याची शक्यता आहे. हिमवृष्टीसाठी आवश्यक असलेले ढग मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून काश्मिर खोऱ्याकडे सरकत आहेत. यामुळे तेथील थंड वाऱ्यांमुळे सुरूवातीला उत्तर भारत व परिणामी विदर्भात गारठा वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.